Wednesday 1 June 2022

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तानाजी चव्हाण यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप !

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तानाजी चव्हाण यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप !


कल्याण, बातमीदार, दि. ३१ – परिवहन विभागात कार्यरत असलेले गेल्या ३७ वर्षांपासून यशस्वीपणे सेवा देणारे सध्या कल्याण कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री. तानाजी चव्हाण हे आज दि ३१ मे २०२२ मंगळवार रोजी नियतवयोमानानूसार सेवानिवृत्त झाले. 


त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयकॉन प्लाझा येथे छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्नेह, प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


ठाणे परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तानाजी चव्हाण यांचा यथोचित सत्कार आणि गौरव केला. यावेळी श्री. तानाजी चव्हाण यांच्या पत्नी, डॉक्टर कन्या व जावई, मुलगा तसेच परिवारातील इतर सदस्य, कल्याण परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे अध्यक्ष, ड्रायव्हिंग स्कूल चे मालक, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाज सेवक, पत्रकार तसेच इतर परिवहन विभागातील अधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी श्री. तानाजी चव्हाण म्हाणाले की, आज ३७ वर्षापूर्वी परिवहन विभागाच्या सेवेत रुजू झालो. संपूर्ण सेवाकार्यकाळात मला माझ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे मी परिवहन विभागात अधिक चांगल्या प्रकारे कार्य करीत सेवा देण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो, प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन व अनमोल अशी केलेली मदत या बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहीन. आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. 

याप्रसंगी उपस्थित मान्यवर, मित्रवर्ग, सहकारी अधिकारी /कर्मचारी तसेच कुटुंबातील सदस्यांनी श्री. तानाजी चव्हाण यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद साळवी आणि सुत्रसंचालन श्रीमती देशपांडे टिव्ही निवेदिका यांनी केले. 
श्री. तानाजी चव्हाण यांना सेवानिवृत्ती निमित्त परिवहन विभागातील विविध कार्यालयाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. आभार प्रदर्शन श्री. रमेश कल्लूरकर (सहा. प्रा. प. अ, कल्याण) यांनी केले.


No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...