Wednesday, 1 June 2022

अलका तुळसे युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !!

अलका तुळसे युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !!


मुंबई, (शांताराम गुडेकर ) :
                एकमेव अद्वितिय झोपडपट्टी असलेल्या वसाहती मध्ये संस्था चालविणे नव्हेतर २५ वर्ष सातत्य ठेवून ती टिकविणे हेच फार मोलाचे कार्य ही संस्था करीत आहे. नावातच डब्ल्यू डब्ल्यू एफ अर्थातच ही फायटर महिलांची, संघर्ष करणाऱ्या महिलांची संघटना आहे म्हणूनच ती अविरतपणे कार्यरत आहे. असे गौरवोद्गार महिला अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) ज्योती ठाकरे यांनी काढले.वुमेन्स वेलफेयर फोरम (WWF) या राज्यस्तरीय संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त दादर माटुंगा कल्चर सेंटर येथे काढले.या प्रसंगी नायर रूग्नालयाच्या सहाय्यक अधिष्ठता डॉ. सारीका पाटील, नगरसेविका हर्षदा मोरे, पर्यावरण तज्ञ रश्मी जोशी, समाजसेवक उद्योजक डॉ. शाताराम कारंडे, महाराष्ट्र बाजार पेठचे संचालक कौतिक दांडगे, वाद्यवृद्ध संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव, सुप्रसिद्ध शाहीर सुखदेव कांबळे, संस्थेच्या अध्यक्षा कल्पना शिंदे, सचिव वंदना गाडेकर, संतोष भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
          वुमन वेल्फेअर फोरम (WWF) मुंबई या सामाजिक संस्थेच्या २५ वा वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील युवा समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने अलका दत्तात्रय तुळसे यांना सन्मा. सौ. ज्योती ठाकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
           ज्योती ठाकरे पुढे म्हणाल्या की, या संस्थेच्या सर्व सभासद ह्या गृहिणी आहेत. गृहिणी म्हणजे घर जिचं श्रृणी असतं अशा महिलांची ही संस्था नक्कीच कौतुकास्पद आहे.कोविड काळात सुद्धा या संस्थेने डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ सोबत मोलाचं कार्य केल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, काच पत्रा गोळा करणे, पापड लाटणे अशा महिलांचं सबलिकरण ही संस्था करीत आहे.याबाबत त्यांनी संस्थेला धन्यवाद दिलेे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला धन्यवाद  देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार दिलिप गाडेकर यांनी करताना त्यांनी संस्थेच्या २५ वर्ष वाटचालीची थोडक्यात माहिती दिली. सुत्रसंचालन नंदकुमार मसुरकर यांनी केले तर आभार सुरज भोईर यांनी मानले. वुमन वेल्फेअर फोरमच्या अध्यक्षा मा. श्रीमती कल्पना शिंदे आणि मा. सौ. वंदना गाडेकर, सौ. संगिता तावरे यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या सामाजिक संस्थेचा "शतक महोत्सवी वर्षात" साजरा होवो, अशी  'शुभेच्छा' व्यक्त करण्यात आली.अलका तुळसे यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, कला, क्रीडा, वैद्यकीय, शैक्षणिक विभागातील अनेक मान्यवर यांनी अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !! ** मा. उच्...