Friday, 24 June 2022

आज दामोदर नाट्यगृहात चिपळूणच्या तरुण शाहीरांची जुगलबंदी !

आज दामोदर नाट्यगृहात चिपळूणच्या तरुण शाहीरांची जुगलबंदी ! 


मुंबई - ( दिपक कारकर ) : 

कोकणच्या लाल मातीतील कैक वर्षे कोकणच्या कलावंतांनी जतन-संवर्धन केलेली कोकणची समृद्ध लोककला जाखडी नृत्य ( शक्ती-तुरा ) या बहुप्रिय कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील लौकिक असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे करण्यात आले आहे. चिपळूण सुपुत्र शक्तीवाले शाहीर शाहिद खेरटकर विरुद्ध तुरेवाले शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली ) यांची पाहण्यासारखी जुगलबंदी रंगणार आहे. 

मनोरंजन, प्रबोधन, काव्य-संगीत यांचा संगम असणारा कार्यक्रम आज शनिवार दि. २५ जून २०२२ रोजी रात्रौ ०८ : ३० वा.दामोदर नाट्यगृह परळ ( मुंबई ) येथे पार पडणार आहे. या सोहळ्याला कोकणातील अनेक शाहीर वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रमेश कोकमकर - ९७७३७४६८२२, रमेश भेकरे - ९५९४३५२८६३ यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...