Wednesday 24 August 2022

शिवसेना पक्षा कडुन मातेला कीराणा कीटची मदत !

शिवसेना पक्षा कडुन मातेला कीराणा कीटची मदत !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

शहापुर तालुक्यातील सावरखुट या गावातील आदिवासी महिलेला डोळी करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात खोडाळा येथे दाखल केले, रात्री तिची प्रस्तुती सुखरूप झाली. परंतु मध्य वैतरणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या या गावाला अजुनही रस्ता नाही, शहापूर तालुका दुर असल्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा आरोग्य केंद्रात उपचार घेवा लागतो.


वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आणि पालघर जिल्हा प्रमुख वैभव संखे यांनी तातडीने दखल घेऊन उप जिल्हा प्रमुख प्रल्हाद काका कदम व तालुका प्रमुख प्रदीप वाघ यांनी या महिलेला किराणा मालाची मदत केली व तिला सावरखुट गावा पर्यंत सुखरुप पोहोचवले. या वेळी सावरखुट ग्रामस्थांनी शिवसेनेचे आभार मानले व रस्ता तातडीने झाला पाहिजे अशी मागणी केली.

यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की शहापूर,वाडा, त्र्यंबकेश्वर, जव्हार मोखाडा व खोडाळा परीसरातील सर्व रुग्णांना उपचारासाठी खोडाळा येथील आरोग्य केंद्रात आसरा घ्यावा लागतो तरी शासनाकडे प्रलंबित असलेल्या खोडाळा ग्रामिण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी प्रदीप वाघ यांनी केली आहे.

यावेळी सावरखुट येथील ग्रामस्थ अंनता वारे, शिवसेनेचे पदाधिकारी मनोज कदम, बलवान देशमुख, नरेंद्र वाघ, निलेश ठोमरे, नंदकुमार वाघ, गणेश खादे, पत्रकार भगवान खैरनार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...