Wednesday 24 August 2022

अंगणवाडी सेविकांनी कुपोषण निर्मूलनासाठी जनजागृती करावी- प्रदिप वाघ.

अंगणवाडी सेविकांनी कुपोषण निर्मूलनासाठी जनजागृती करावी- प्रदिप वाघ.


जव्हार- जितेंद्र मोरघा :
 
मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे महिला बालविकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका यांना संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की, मोखाडा तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आपण घरोघरी जन जागृती करणे आवश्यक आहे, कमी वयात होणार बालविवाह, कुटूंब नियोजन, संतुलित आहार, रानभाज्या व नागली उडीद, कडधान्य पदार्थ जेवणात समावेश या बाबतीत आपण जनजागृती करावी लागेल असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी आशाताई झुगरे सभापती, विमल कोथे मुख्य सेविका व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...