Thursday, 2 May 2024

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एकाच छताखाली सर्वांना स्थळे मिळून वेळ व पैशांची बचत व्हावी ह्या उद्देशाने कल्याणात सकल धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
      कल्याण पश्चिमेतील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे रविवार दिनांक ५ मे रोजी श सायंकाळी ५ वाजता धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मनोरे यांच्या हस्ते ह्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष देवराम कंखरे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून याप्रसंगी सर्वश्री समाधान मोरे, विलास तायडे, संजय लाळगे, समीर मानकर, योगेश घोलप, राहुल परदेशी, गजानन सोनवणे, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर कंखरे, कौतिकराव बस्ते, शांताराम माने, ज्ञानेश्वर काटकर, सुधाकर बाविस्कर, दिलिप सुर्यवंशी, श्यामभाऊ सोनवणे, लालचंद कंखरे, रघुनाथ पाटील, रावण धनगर, सुनिल वैदय, अशोक धनगर, सतिश हडपे, शंकर लांडगे, विनोद सावळे, महेश सावळे, हर्षद ठोके, संगिता बाविस्कर, प्रतिभा ठोके, मिनाक्षी खराटे, लता मनोरे, शितल घोलप, सुरेखा बोरसे, कविता बागुल, अर्चना खांगटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून अधिक माहितीसाठी आयोजक अनिल काकडे भ्रमणध्वनी 9324552963 /8104211818 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !! विरार प्रतिनिधी/पंकज चव्हाण वसई-विरार शहर महानगरपा...