भिवंडी- कल्याण शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणास येणार वेग !
"मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय" ५६१ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद
कल्याण, बातमीदार : मुंबईतून ठाणे, कल्याणकडे जाण्यासाठी वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो. आता भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी सुमारे ५६१ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर राबविण्यात येईल.पत्री रेल्वे उड्डाण पूल, कटई येथील २ रेल्वे उड्डाण पूल व विद्युत वाहिन्या व जल वाहिन्या स्थलांतरीत करणे इत्यादी कामांमुळे कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने हा खर्च वाढला आहे.

No comments:
Post a Comment