दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन !
बुलडाणा, दि. ३ : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालांतपूर्व आणि शालांत परिक्षोत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्चश्रेणी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
scholarshrip.gov.in
यासाठी शाळा, महाविद्यालयांनी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांचे अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarshrip.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावयाचा आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना - दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती, विद्यार्थी नोंदणी दि. ३० सप्टेंबर २०२२, सदोष अर्ज पडताळणी दि. १६ ऑक्टोबर २०२२, संस्था पडताळणी दि. १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर पोस्ट मॅट्रीक विद्यार्थी नोंदणी दि. ३१ ऑक्टोबर २०२२, सदोष अर्ज पडताळणी तारीख दि. १५ नोव्हेंबर २०२२, संस्था पडताळणी दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती विद्यार्थी नोंदणी दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, सदोष अर्ज पडताळणी तारीख दि. १५ नोव्हेंबर २०२२, तर संस्था पडताळणी दि. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत करण्यात येणार आहे.
तरी दिव्यांग विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावे, असे आवाहन महाराष्ट्र शासन समाज कल्याण तर्फे करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment