Tuesday 23 August 2022

भंडारदरा येथे क्रांतीभूमी व पर्यटन स्थळांची मुबलकता असताना 'भक्तनिवासाचा, अभाव, अनेक इमारती कोसळण्याच्या स्थितीत ?

भंडारदरा येथे क्रांतीभूमी व पर्यटन स्थळांची मुबलकता असताना 'भक्तनिवासाचा, अभाव, अनेक इमारती कोसळण्याच्या स्थितीत ?



कल्याण, (संजय कांबळे) : सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगांमध्ये आद्यक्रांतीवीरांची क्रांतीभूमी, ब्रिटिश काळातील जलाशय, याच्या सभोवती निसर्गाने मुक्तहस्ते केलेली पर्यटन स्थळांची उधळण, असे सर्व पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती संधी उपलब्ध असताना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यावश्यक असणारे "भक्तनिवास"चा मात्र पूरता अभाव दिसून येतो आहे. येथील अनेक शासकीय अथवा निमशासकीय इमारती या मोडकळीला आल्या आहेत. यांची डागडुजी केली तर शेकडो पर्यटकांची सोय येथे होऊ शकते. परंतु स्थानिकांचे दुर्लक्ष व शासकीय अधिका-यांची उदासीनता प्रकर्षांने जाणवते.


इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे जन्मगाव अकोले तालुक्यातील भंडारदरा (विल्सन डँम) या प्रसिद्ध जलाशयापासून काही अंतरावर देवगाव आहे, याच भूमित त्यांचे मित्र, सखा सोबती, गुरु देवजी आव्हाड, आणि त्यांचे असंख्य सहकारी येथीलच, क्रांतीची साक्ष देणारा व प्रवराला अंखडपणे प्रवाहित करणारा रतनगड याच ठिकाणी आज दिमाखात उभा आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर येथेच, भंडारदरा जलाशयाच्या सर्व बाजूंनी साधारणपणे ५०/५५ किमी रस्त्यावर अनेक पांढरे शुभ्र धबधबे जागोजागी खुणावत आहेत, नेकलेस फाँल,न्हानी फाँल, रेदा फाँल, अंब्रेला फाँल, असे कितीतरी धबधबे भंडारदरा जलाशय गुप्त होत आहेत, आशिया खंडातील दोन नंबरची सांदन दरी येथेच आहे 


शिवाय इ स १२/१३ व्या शतकात बांधलेले अमृतेश्वर मंदिर रतनवाडी येथे आहे. अंत्यत पुरातन मंदिर असून अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे, येथून पुढे कोकणकडा, घाटघर प्रकल्प आहे,


भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे अनेक ब्रिटिश अधिका-याचे बंगले आजही चांगल्या स्थितीत आहेत, निसर्गाने मुक्त हस्ते येथे नैसर्गिक सौदर्याची उधळण केल्याने, राम तेरी गंगा मैली, मजदूर, तानाजी अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे शुंटिग येथे झाले आहे. १९१० मध्ये भंडारदरा धरणाचे बांधकाम सुरू होऊन १९२६ मध्ये ते पुर्ण झाले होते, त्याकाळी सुमारे ८८६ लक्ष रूपये इतका खर्च बांधकामासाठी आला होता. जलाशयाच्या सभोवताली मुरशेत, पांगरे, उडदावने, शिंगणेवाडी, घाटघर, रतनवाडी, कोलटेंब, साबरथ, मुतखेल आदी गावे व वाड्या आहेत.


यातील केवळ रतनवाडी येथे भक्त निवास आहे, ६ रुम व २ हाँल यामध्ये असून हे बांधून २/३ वर्षे होऊन येथे विद्यूत पुरवठा केलेला नाही, याच्याच मागे अनेक इमारत आहेत, त्यातील काही मोडकळीस आलेल्या आहेत. शेंडी येथे जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रांमगृह आहे, परंतु तेही बिकट अवस्थेत आहे.


भंडारदरा हे एक असे पर्यटन स्थळ आहे की येथे देशप्रेम, देशभक्ती बरोबरच मन प्रसन्न करणारे आल्हाददायक नैसर्गिक वातावरण आहे, यामुळे येथे वर्षभर पर्यटक येवू शकतात.

रतनवाडी, शेंडी कळसुबाई येथे सर्वसामान्यांना परवाडणारी अशी भक्त निवास निर्माण केल्यास नक्कीच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन ग्रामपंचायतीना देखील उत्पन्न मिळू शकते. या परिसरातील अनेक इमारतीची डागडुजी केली तर अशा ठिकाणी देखील पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते. गरज आहे ती प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची !

प्रतिक्रिया

राहूल शेळके (गटविकास अधिकारी, अकोले पंचायत समिती, अकोले)

मी दहा ते पंधरा दिवसापूर्वी रतनवाडी ग्रामपंचायत येथे भेट दिली होती, विद्यूत मंडळाच्या अधिका-यांशी बोललो आहे, लवकरच येथील भक्त निवासांस विद्यूत पुरवठा होईल,

*किशोर पंडित (सामाजिक कार्यकर्ते, ठाणे)

सर्वानाच खाजगी हाँटेल व रेस्टॉरंटमध्ये राहणे परवडत नाही, त्यातच महागाई भयानक वाढली आहे, त्यामुळे भक्त निवास सुरू झाल्यास सर्वसामान्यांची सोय होईल.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...