Wednesday 24 August 2022

जव्हारच्या शेतकऱ्यांना सोनचाफा लागवडीचे मार्गदर्शन !

जव्हारच्या शेतकऱ्यांना सोनचाफा लागवडीचे मार्गदर्शन !


जव्हार- जितेंद्र मोरघा :

जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प  जिल्हा पालघर अंतर्गत आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमा अंतर्गत आदिम जमातीच्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी सोनचाफा लागवड करण्यासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेअंतर्गत ४५ लाभार्थींची निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्फत प्रकल्प कार्यालय जव्हार येथे मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विज्ञान बारामती येथील तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना सोनचाफा लागवड करण्यासाठी शेतात खड्डे खोदणे याबाबत  तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर लागवडीसाठी शेतकऱ्यांना सोनचाफाची रोपे वाटप करण्यात आली.
 
ह्या कार्यक्रम प्रसंगी जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह (भा.प्र.से), सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय मोरे, विषय विशेषज्ञ मिंलींद जोशी, कार्यालय अधीक्षक रोहिदास तावडे , कनिष्ठ लिपिक संजय कांगणे, गुरूनाथ वाघ, रामेश्वर आमझरे, सिताराम सवरा व शेतकरी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...