औरंगाबाद, अखलाख देशमुख (सिल्लोड) दि २६ : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे आज दीपावली, पाडवा व भाऊबीज निमित्त सिल्लोड शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जुने मित्र, स्नेही व मित्रजनांच्या घरी सदिच्छा भेट देऊन दीपावली, पाडवा व भाऊबीज निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे , नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, न.प. तील बाळासाहेबांची शिवसेनेचे गटनेते नंदकिशोर सहारे, नगरसेवक मनोज झंवर, सुनील दुधे, सतीश ताठे, विशाल जाधव, शिवाजी गायकवाड, आशिष कटारिया, गौरव सहारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment