*_डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांचा संदेश पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी_*
*_5 ऑक्टोबर 2022 च्या धम्म अधिवेशन ला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा._*
*मुंबई | डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन,दादर.*
*मी भीमराव यशवंतराव आंबेडकर.*
भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष
आणि भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण ट्रस्टी, कार्यकारणीच्या वतीने येणारा 5 ऑक्टोबर अशोका विजयादशमी धम्मचक्र परिवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभा पहिल्यांदा नागपूरच्या दीक्षाभूमी वरती बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा संदेश 66 वर्षानंतर पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे अधिवेशन दीक्षाभूमीच्या बाजूला सोशल वेल्फेअर च्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे.
सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या विशेषता विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना, सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी 5 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली जे धम्म अधिवेशन होणार आहे. त्याला आपली उपस्थिती पाहिजे.
हे धम्म अधिवेशन जे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ६६ वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 ला जो संदेश दिला होता. तो पुन्हा आपण संदेश भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली संस्थेच्या अधिपत्याखाली हा संदेश पुन्हा एकदा नागपूरच्या भूमीवरून संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न होत आहे. त्या ऐतिहासिक प्रसंगी आपली उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे.
या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण वारसदार व्हा. अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून करतो.
लाखोंच्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे अधिवेशन यशस्वी करावे अशी विनंती करतो.
*नमो बुद्धाय.!जय भीम.!!*
आपला
*भीमराव यशवंतराव आंबेडकर*
राष्ट्रीय कार्याध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा.
-----------------------------------
थेट पवित्र दिक्षा भुमी नागपूर येथुन.
*तानाजी कांबळे | पत्रकार*
7507966260
No comments:
Post a Comment