Tuesday 1 November 2022

कोकणात भात कापणी कामाला वेग !

कोकणात भात कापणी कामाला वेग !


कोकण, (शांताराम गुडेकर) :
            कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह पालघर या चार जिल्ह्यात दसऱ्यानंतर भात कापणीला सुरुवात होते. कोकणात भात कापणीला वेग आला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे.काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्याने भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे बळीराजाचे नुकसान होत आहे. भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून मोठ्या कष्टाने पिकवलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच रान डुक्कर आणि अन्य प्राणी या हातात आलेल्या पिकाचे खूप नुकसान करत आहेत.


वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, शेतकरी हवालदिल.....

          परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने उभं भात आडवं झालं आहे. त्यामुळे पडलेल्या भाताला कोंब आल्याने ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्याने वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


शशिकांत शां. आग्रे
आंगवली (रेवाळेवाडी )ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...