Friday, 25 November 2022

संविधान दिनाच्या पूर्वसंध्ये निमित्त ‘विधी संवाद’ कार्यक्रम संपन्न !

संविधान दिनाच्या पूर्वसंध्ये निमित्त ‘विधी संवाद’ कार्यक्रम संपन्न !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जनसामान्यांना कायदेविषयक  माहिती मिळावी व त्याचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्ती व पिडीत महिलांना मिळावा यासाठी नि:शुल्क कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ल्या करिता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘कौटुंबिक समुपदेशन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. यासोबतच जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे न्यायाधीश व सचिव मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे माननीय अनंत किशोर देशमुख व प्रमुख मार्गदर्शक अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच माजी महापौर मुंबई आदि लाभले होते.

वस्तीपातळीवर  प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका ही प्रथम व्यक्ती आहे जी थेट लोकांपर्यंत पोहचत असते. महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत मुंबई शहरातील अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका यांच्या मदतीने  सदर जनजागृती जास्त प्रभावीपणे होईल या हेतूने हे आयोजन करण्यात आले होते. आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण १३० अंगणवाडी सेविकांना व मुख्य सेविका व त्यांचे प्रमुख बाल विकास प्रकल्प अधिकारी, कुलाबाचे मा. सांबरे साहेब उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने चालणारे कामकाजाबद्दल सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दीप्ती  नाखले यांनी माहिती दिली. संविधानपर बोलताना मा. अनंत देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्देश उपस्थितांना पटवून दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आज आपण अापली मते मोकळेपणाने मांडू शकतो आणि हा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. हे अखंडितपणे फक्त भारतात अजून आहे,  असं ते म्हणाले.

कौटुंबिक हिंसाचार कायद्या बद्दल मा. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय, हुंडा, अंधश्रद्धा अश्या विविध पद्धतीने छळवणूक  कशी केली जाते याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांना उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सेविकांकडून  आलेल्या लोकांच्या अडचणी व समस्या यावर त्यांच्याकडून निरसन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !!

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !! ...