शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेतर्फे के.ई.एम.रुग्णालय व टाटा रुग्णालय परेल येथील गरीब गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना के.ई.एम.रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार (गेट नंबर २) येथे मोफत अन्नदान !
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा डॉ.शुभा राऊळ व कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाने के.इ.एम.रुग्णालय परेल व टाटा रुग्णालय परेल येथील गरीब गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना दिनांक २२/०१/२०२३ रोजी के.ई.एम. रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार (गेट नंबर २) येथे मोफत अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ, स्थानिक शिवसेना मा.नगरसेवक श्री.अनिल कोकीळ, आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे, मुंबई जिल्हा सचिव सौ.ज्योति भोसले, सौ.सुप्रिया ठोंबरे, मानखुर्द विधा.समन्वयक श्री.अभिजित देसाई, घाटकोपर विधा. सचिव श्री.सिद्धेश मोहिरे, शाखाप्रमुख श्री.किरण तावडे, भा.वी.सेनेचे श्री.रमेश सावंत, समाजसेविका सौ. रेश्मा सकपाळ गावकर, मा.उपविभाप्रमुख श्री.भारत म्हाडगुत, श्री.मिनार नाटाळकर, श्री नंदकुमार बागवे, श्री.हितेश गायकवाड, श्री.महेश सरफरे, श्री.दत्तराज आंब्रे, श्री.प्रीतेश सकपाळ, श्री.लितेश केरकर, श्री.सुहास परब, श्री.साक्षत म्हात्रे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment