मविआचे उमेदवार विक्रम काळेंच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली शिक्षकांची भेट !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ :- शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे हे नेहमी मंत्रालयात, मंत्र्यांकडे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करतात. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित सहशिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात, शिक्षकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या विक्रम काळे यांना शिक्षकांनी मतदानातून मदत करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथील ज्ञानेश विद्यामंदिर, राजश्री शाहू विद्यालय, तुळजाभवानी विद्यालय, सुशिलादेवी विद्यालयातील शिक्षकांची आज दानवे यांनी भेट घेतली.
उमेदवार काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी, विठ्ठल बदर सर, दत्ता पवार सर, रामनाथ पंडूरे सर, मुंगळे सर, पैलवान सर, बाबासाहेब डांगे, शिवसेना शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उप शहरप्रमुख उप शहर प्रमुख दिग्विजय शेरखाने, लक्ष्मण पिवळ युवासेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे, नगरसेवक मनोज गांगवे, कमलाकर अण्णा जगताप, युवासेना शहरप्रमुख स्वप्नील डीडोरे, सतिष पवार, रवी गायकवाड सदाशिव पप्पुलवाड, मनोज बोरा, भाऊसाहेब राते, सचिन वाघ, विष्णू गुंठाळ, सतीश काळे, संतोष लिंबेकर,भूषण कोळी, शिवाप्पा बेंद्रे यांच्यासह सर्व विद्यालयातील शिक्षकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment