Monday 27 February 2023

पत्रकार काशिनाथ म्हादे 'निर्भीड पत्रकार' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार काशिनाथ म्हादे 'निर्भीड पत्रकार' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )

                 गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे राजकीय पत्रकार काशिनाथ म्हादे यांना निर्भीड पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले.वरीष्ठ पत्रकार आणि दै. प्रहारचे संपादक डॉ.सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या नोंदणीकृत संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ, सरचिटणीस सामंत, उपाध्यक्ष के. रवी आणि मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यावेळी उपस्थित होते.
            काशिनाथ महादेव म्हादे गेल्या १३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. क्राईम, शिक्षण, आरोग्य, मुंबई महापालिका बीट ते राजकीय वार्ताहर असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. दैनिक लोकमत, सकाळ, आपलं महानगर, तरूण भारत बेळगाव, नवशक्ती, पुढारी या अग्रगण्य वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. मागील 2 वर्षांपासून Etv भारत या वेबचॅनलसाठी मंत्रालय प्रतिनिधी आणि राजकीय वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. 
             रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यातील तळसर गावचे काशिनाथ म्हादे रहिवासी. घरची परिस्थिती अतिशय बेताची. आई - वडील शेतकरी. त्यामुळे आते भाऊ श्रीकांत पिटले यांनी त्यांना मुंबईत आणले. दत्ताराम वकटे भावोजींनी नोकरीला लावले. शिक्षण घेत असताना इथून खरी पत्रकारिता करीअरची सुरुवात झाली. आई, बहीण भाऊ यांचा विरोध होता. मात्र वडिलांना मुलाच्या मेहनतीचा नेहमीच अभिमान होता. आज राजकीय पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कार्याची दखल घेत गौरव केला आहे. गावातील संघटनांपासून चार हात लांब असलेले पत्रकार काशिनाथ म्हादे कोकण विभाग म्हादे परिवार विभाग संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान मुंबई या संघटनेचे सरचिटणीस आहेत.
             सुकृत खांडेकर यांच्या सोबत दै. नवशक्ती या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या हातून हा पुरस्कार मिळणे हे माझं भाग्य समजतो. मात्र, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. अनेक हातानी मला इथपर्यंत पोहचवले आहे. माझी आई छाया, पत्नी आदीती, मोठी बहीण जयश्री लाड, माई, ज्योती, पिंकी, भावोजी जयंत लाड, निलेश शिगवण, प्रशांत रेवाळे, अनंत चव्हाण, भाऊ रवींद्र आणि संदेश, संदीप दादा, त्यांच्या पत्नी पिंकी, अस्मिता, माया म्हादे, माझा जिवलग मित्र तथा मार्गदर्शक कोकणवृत्तसेवाचे मुख्य संपादक प्रशांत गायकवाड, रुपेश सुर्वे, अमित राणे, प्रदीप भीतळे, ईटीव्हीचे व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ आणि प्रमुख मार्गदर्शक सुरेश ठमके यांनी झोकून काम करण्यास दिलेल्या संधीमुळे हा मान मिळाला, असे मत काशिनाथ म्हादे यांनी व्यक्त केले. तसेच, पुरस्कार बाबांना समर्पित केल्याचे ते म्हणाले. आज ते हयात नाहीत, मात्र नेहमीच लढण्याचे बळ आणि जिंकण्याची जिद्द देतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...