Sunday 19 February 2023

शिवसेनेच्या (उ.बा.ठा) वतीने जल्लोषात शिवजयंती साजरी !

शिवसेनेच्या (उ.बा.ठा) वतीने जल्लोषात शिवजयंती साजरी !

*औरंगाबाद, अखलाख देशमुख,  दि १९ :-*  लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उ.बा.ठा) वतीने आज १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवसेनेच्या वतीने  शिवजयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रम राबवून मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उप जिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, जयवंत ओक, राजेंद्र राठोड, बप्पा दळवी, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, उपशहर प्रमुख दिग्विजय शेरखाने, संतोष खेंडके, वामनराव शिंदे, बाप्पा दळवी, मकरंद कुलकर्णी, संजय हरणे, कमलाकर अण्णा जगताप, मोहन मेघावाले, अनिल जयस्वाल, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, शहर संघटिका आशा दातार, सूनिताताई देव, मिराताई देशपांडे,  विद्या अग्निहोत्री, भागू अक्का शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...