Monday, 27 February 2023

मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे संपन्न !

मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे संपन्न !

 मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर )

           मुंबई शिरोडकर हॉल येथे सर्वांच्या वैद्यकीय सेवेसाठी मदतीला धावून येणाऱ्या मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे रविवारी  संपन्न झाला. संस्थापक श्री.अनंत धोंडू काप यांच्या संकल्पनेतून गोर -गरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेसाठी सुरू केलेल्या चळवळीला खरी साथ मिळाली. तर या उदघाटन सोहळा समयी विविध क्षेत्रात काम करणारे समाज सेवक / उद्योजक आणि श्री.अनंत काप यांच्यावर प्रेम करणारे स्नेही मंडळी उपस्थित होते.

           रक्तदान शिबिर राबण्यामागचा उद्देश  सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता  मुंबई सरकारी हॉस्पिटलमध्ये मधील ब्लड बँक मध्ये रक्त साठा मुबलक नाही.सर्व सामान्य जनतेच्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास प्रायव्हेट ब्लड बँक वाजवी पेक्षा पैसे मोजावे लागतात. अशा परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला रुग्णास रक्त लागल्यास आपल्या हक्काची मायभूमी फाऊंडेशनचे शिलेदार - रुग्ण सेवेकरी त्यांच्या ओळखीने निस्वार्थपणे रक्त उपलब्ध करून देतात.या मागचे कारण त्यांच्या मध्ये असलेली माणुसकी समजली जात आहे.सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. आणि रक्तदान शिबिरात २८० रक्त दात्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

           प्रमुख अतिथी सर. जे जे रुग्णालयाचे अधीक्षक मा. डॉ.संजय सुरासेसर, मंडणगड तालुक्याचे माजी सभापती श्री.दौलतराव पोस्टूरे, उद्योजक श्री. मनोज शेठ घागरुम, उद्योजक श्री. महेंद्र टिंगरे, डॉ.चेतन भगत सर, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुभाष पोस्टुरे, श्री चंद्रकांत करंबेले, सर जे.जे. रुग्णालयाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. काशिनाथ राणे,सचिव श्री. महेश चव्हाण, श्री. चेतन मोरे (माणगाव), श्री.सुधीर कदम (दापोली), दशरथ डांगरे, पुष्पा बेर्डे‌ (शताब्दी हॉस्पिटल), श्री. प्रदीप मोगरे ( के. एम. हॉस्पिटल), श्री.नितीन चाळके (रुग्णसेवक), शिवशंकर बांदरे, विश्वास शिंदे, तुकाराम गायकवाड, सुनील माळी, तुकाराम गायकवाड, विश्वनाथ रक्ते, सुनील माळी,जल फाऊंडेशन श्री.नितिन जाधव,श्री.सचिन म्हादळेकर इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मायभूमी फाउंडेशन उद्घाटन सोहळा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कोकणातील खेड, दापोली, मंडणगड, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यातील रक्तदात्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
             कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माय भूमी फाउंडेशनचे संचालक मंडळ मा. श्री महादेव धामणे, (कार्याध्यक्ष) श्री.अनंत कोबनाक (सचिव ), श्री रघुनाथ पोस्टुरे (उपाध्यक्ष), श्रीसत्यजित भोनकर, (सहसचिव) ,श्री.कृष्णा रावजी चाचले (कोषाध्यक्ष), श्री. विठ्ठल शिगवण, सहखजिनदार श्री.दीपेश हेलगावकर (वैद्यकीय सदस्य),श्री. संजय पातेरे (क्रीडा सदस्य ),श्री.प्रदीप मोगरे (सल्लागार), श्री.नितीन चाळके (सल्लागार) इतर अनेक फाउंडेशनच्या सहकाऱ्यांचा  कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा होता. त्या सर्व शिलेदारांचे, रक्तदात्यांचे माय भूमी फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष श्री. अनंत काप यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ, चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा ! मुंबई, (शांताराम गुडेकर) :         समाजात विविध क...