पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २५ : सहकार मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याला समाजातील सर्व स्तरातून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला.
पहिल्या सत्रात मोटिवेशनल स्पीकर राहुल नावंदर यांनी 'सकारात्मक विचार कसे करावेत' याबाबत मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास हा ज्ञान, माहिती आणि अनुभव कौशल्यावर आधारित असून दिनचर्येचे सुयोग्य नियोजन केल्यास आपल्याला यश निश्चितच लाभू शकते असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महारोजगार मेळाव्यांचे वेळोवेळी आयोजन केले जात असून २०२४ पर्यंत १० लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ नाना बागडे, आमदार नारायण कुचे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment