Wednesday, 29 March 2023

महाविकास आघाडीच्या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा जालना येथे 'शिवसेना नेते चंद्रकांत खैरे' यांचे आवाहन !

महाविकास आघाडीच्या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा जालना येथे 'शिवसेना नेते चंद्रकांत खैरे' यांचे आवाहन !

जालना, अखलाख देशमुख, दि २९ : २ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ महाविकास आघाडीची या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांनी केले. 

जालना येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत खैरे यांनी आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा सचिव पटवर्धन, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे,  उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, रावसाहेब राऊत, प्रा. गोपालसिंह बछिरे, भगवान कदम, बाबुराव पवार, परमेश्वर जगताप, अशोक आघाव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, मुरलीधर शेजूळ, जिल्हा युवा अधिकारी शिवाजी शेजूळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडण्याचे अत्यंत पातक शिवसेना पक्षातील फुटिरांनी केले असून, त्यांच्या विषयी प्रचंड रोष आज सर्वसामान्य जनतेत पाहावयास मिळत आहे. राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होणार्‍या सभा या अत्यंत विराट स्वरूपात होत असून, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या फुटिरांच्या पायाखालीची वाळू सरकली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणारी सभाही ‘अशीच ना भूतो, ना भविष्यती अशी’ यशस्वी करायची असल्याचे ते म्हणाले. या करिता जालना जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांनी गावो-गावी जाऊन येथील सामान्य शेतकरी व नागरिकांना या सभेस हजारोच्या संख्येने सहभागी करावे. आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपणास भक्कमपणे उभे राहायचे असून, या सर्व फुटिरांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले. 

यावेळी उपनेते लक्ष्मण वडले यांनी सभेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे यांनी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गणातून सामान्य नागरिक, शेतकरी, महिला हजारोच्या संख्येने महाविकास आघाडीच्या सभेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. 

यावेळी तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, हरिभाऊ पोहेकर, उद्धव मरकड, कुंडलिक मुठ्ठे, अजय अवचार, सुदर्शन सोळुंके, भरत सांबरे, उद्धव भुतेकर, बाबुराव कायंदे, सखाराम गिराम, प्रभाकर उगले, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, युवासेनेचे मंगेश गव्हाड, माजी जि.प. सदस्य कैलास चव्हाण, बबनराव खरात, गणेश डोळस, खालेक कुरेशी, माजी सभापती भगवान शिंदे, भरत मदन, अरुण डोळसे, डॉ. राजेश राऊत, प्रभाकर घडलिग, श्रीरंग खरात, संदीप नाईकवाडे, बबनराव मिसाळ, गंगूबाई वानखेडे, किशोर नरवडे, अनिल अंभोरे, अंकुश राजेजाधव, प्रमोद फदाट, विदूर जईद, देविदास पैठणे, शीतल मुरकुटे, प्रिया जाधव, रामेश्वर कुरिल, विठ्ठलराव खरात, गजानन मुळे, योगेश शर्मा, संदीप मगर, गजानन बनकर, नंदकिशोर पुंड, शंकर जाधव, दीपक कदम, ज्ञानेश्वर गोरे, अरुण डोंगरे, परमेश्वर डोंगरे, जीवन खंडागळे, भगवत घोडके, शेख रफीक, बबन काजळे, भगवान काकडे, विमोचन बोरसे, संदीप गोरे, जनार्धन गिराम,  सुदर्शन चौधरी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*स्त्रीविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या आमदार संजय शिरसाट यांचा निषेध*

दरम्यान बैठकीच्या समारोपानंतर सर्व शिवसेना नेते व पदाधिकार्‍यांनी नुकतेच स्त्रीविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत तीव्र निषेध केला.

No comments:

Post a Comment

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम... मुरबाड- (योगेश्वरी मणी)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...