Sunday 5 March 2023

होळी, धुळवडीच्या रंगात पाणी टंचाईचा बेरंग, तालुक्यातील अनेक गावात नैसर्गिक व तांत्रिक कारणामुळे पाणीटंचाई ?

होळी, धुळवडीच्या रंगात पाणी टंचाईचा बेरंग, तालुक्यातील अनेक गावात नैसर्गिक व तांत्रिक कारणामुळे पाणीटंचाई ?

कल्याण, (संजय कांबळे) : माणसाच्या आयुष्यात आणि समाजात उत्साह निर्माण करणारा तसेच कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या होळी आणि त्यानंतर धुलीवंदनाच्या रंगात पाणी टंचाई मुळे बेरंग येणार असून ही 'टंचाई, काही ठिकाणी नैसर्गिक आहे तर काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे निर्माण झाली आहे.

कल्याण तालुक्यात चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, उल्हास, बारवी, भातसा आणि काळू, यातील उल्हास नदीवर एकमेव रायता प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. तर बऱ्याच ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या स्वंतत्र पाणी पुरवठा योजना आहेत. असे असूनही अनेक कारणांमुळे तालुक्यातील अनेक गावात, वाड्यावस्त्यांवर जानेवारी, फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाई सुरू झाली आहे.नालिबी ठाकूरपाडा, जिभवणीवाडी, खडवली, गेरसे, दानबाव, काकडपाडा, वावेघर, ठाकूरपाडा, आदी तालुक्यातील गाव व वाड्यावस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यातील २२८ गावे व ४३७ पाडे असे ६६५ गावे टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. सध्या २ गावे व ६ पाड्यात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून यांना टँकरने पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. हीच परिस्थिती मुरबाड व भिवंडी तालुक्याची आहे. ही नैसर्गिक पाणी टंचाई असली तरी कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ पाडा ते कांबा, पाचवामैल या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी लाईन फुटल्या, नादुरुस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून वरप गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इतर ठिकाणी लाईटबील न भरल्याने किंवा मोटार पंप जळाल्याने पाणी बंद झाले आहे.

नदी काठच्या गावातील महिला, पुरुष कसेबसे डोक्यारुन, बैलगाडी च्या माध्यमातून पाणी आणत आहे. परंतु आदिवासी वाड्यापाड्यात भयानक परिस्थिती आहे. पाण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतर वनवन भटकावे लागत आहे. शासनाने कोटींच्या जलजीवन च्या योजनांची घोषणा केली, निधीची तरतूद ही केली. परंतु कामाचा ठेका देण्याघेण्यावरुन अनेक गावात वाद सुरू होऊन योजना रखडल्या आहेत. यामुळे हरघर मे नल सेजल तर सोडाच, विहीर, बोरवेलचे पाणी देखील मिळत नाही. सरकारी अधिका-यांची उदासीनता व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा महिलांच्या डोक्यावरील 'हंडा,उतरला नाही. हे कटू सत्य राजकारणी नाकारु शकतात का?

उद्या होळी आहे, त्यानंतर धुळवड, रंगात रंगण्याचा सण, मात्र पाणी टंचाई मुळे याचा बेरंग झाला आहे. आधीच पेट्रोल, डिझेल, गँस, सीएनजी, खाध्य वस्तू महागाई ने गोरगरिबांच्या जीवनात वणवा पेटला आहे, अशात थोडासा आंनद देणारा होळी सण आला, परंतु त्यातही पाणीटंचाई ने बेरंग केला, दोष कोणाला द्यायचा नशिबाला, की निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी ला? हे तूम्हीच ठरवा !

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...