Sunday 5 March 2023

आदिवासी समाजाचा इतिहास साहित्यरत्न डॉ. गोविंद गारे यांच्या मुळे - प्रदिप वाघ

आदिवासी समाजाचा इतिहास साहित्यरत्न डॉ. गोविंद गारे यांच्या मुळे - प्रदिप वाघ

जव्हार, जितेंद्र मोरघा -

जव्हार जुना राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न, महान संशोधक डॉ. गोविंद गारे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रदीप वाघ यांनी डॉ. गोविंद गारे यांच्या जीवनातील महत्वाच्या बाबी व त्यांचे आदिवासी समाजासाठी केलेले अविस्मरणीय कार्याचा आढावा समाजा समोर प्रदीप वाघ यांनी मांडला.

यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की महादेव कोळी समाजातील जन्माला आलले हे रत्न आदिवासी समाजाला वेगळी ओळख निर्माण करून गेले, त्यांच्या लेखणीतुन आदिवासी समाजाचे वास्तव्य व इतिहास जगासमोर आला, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय देखील डॉ‌. गोविंद गारे यांच्या मुळे शासनाने घेतले असे देखील प्रदीप वाघ यांनी सांगितले.

तसेच जसा इतिहास डॉ. गारे साहेबांनी आपल्याला सांगितला, तो आपण अभ्यास करून पुढच्या पिढीला प्रेरणा देऊन समाज संघटीत करावा असं आवाहन तरुणांना केले.

यावेळी महादेव कोळी समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने समाजातील होतकरू व संघटनेसाठी मेहनत घेणाऱ्या युवा कार्यकर्ते यांचा जव्हार संस्थानचे राजे यशवंतराव मुकणे महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच जुन्या राजवाड्याची साफसफाई करून, राजवाड्याला रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आले हे काम करणाऱ्या समाज बांधवांना देखील सन्मानित करण्यात आले.

यावेळी महादेव कोळी समाज उन्नती मंडळांचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने समाज बांधवांनी डॉ. गोविंद गारे यांना आदरांजली अर्पण केली व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...