Sunday 5 March 2023

सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅनचा अपघात ; दोन जखमी, पोलीस निरीक्षक गंभीर !

सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅनचा अपघात ; दोन जखमी, पोलीस निरीक्षक गंभीर !

                               अपघातातील पोलीस व्हॅन.

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.०५ : अजिंठा लेणी बंदोबस्त साठी फर्दापुरकडे जात असलेल्या सोयगाव पोलीस व्हॅनचा एका पाठोपाठ एक असे दोन टायर फुटून अपघात झाला आहे.या घटनेत सोयगाव च्या पोलीस निरीक्षक सह दोघे गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी फर्दापुरजवळ घडली या घटनेत सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना जबर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तर दुसरे जखमी पोलीस शिपाई सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी फर्दापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या बंदोबस्त कामी सोयगावचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार व पोलीस शिपाई रवींद्र तायडे हे पोलीस ठाण्याच्या व्हॅन  क्र-एम एच-२०  ६८९७ मध्ये फर्दापुरकडे जात असताना फर्दापुर गावाजवळ पोलीस व्हॅनचे अचानक एका पाठोपाठ एक दोन्ही टायर फुटल्या मुळे पोलीस व्हॅनने तीनवेळ पलटी होऊन एका शेतातील जाळ्यात फेकल्या गेली या घटनेत पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना हाताला मेंदूला व गंभीर जखमी झाले तर पोलीस शिपाई रविंद्र तायडे यांना ही गंभीर मार लागला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना छत्रपती संभाजीनगर तर रवी तायडे यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे 

------टायर फुटातच व्हॅन चेंडू सारखी हवेत

सोयगाव पोलीस ठाण्याच्या व्हॅन चे दोन्ही टायर फुटून व्हॅन आधी हवेत उंच उडाली त्यानंतर तीनवेळा पलटी खाऊन अखेर एका शेतात जाळ्यात व्हॅन अडकली होती व्हॅन हवेत उंच उडताच पोलीस निरीक्षक अनमोल केदार पोलीस शिपाई रवी तायडे हे दोन्हीही फेकल्या गेले घटनास्थळी फर्दापुर,सोयगाव पोलिसांनी धाव घेवून तातडीने गंभीर जखमींना उपचारासाठी दाखल केले.

-----फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे हे रजेवर असल्याने त्यांच्या जागेवर सोयगाव चे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना प्रभार दिला होता त्यामुळे त्यांना अजिंठा लेणी बंदोबस्त कामी जावे लागले होते या प्रकरणी पुढिल तपास फर्दापुर पोलीस करत आहे.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...