Friday, 19 June 2026

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : दि.१६/०६/२०२६ रोजी सिडको द्रोणागिरी आ‌ॅफीस बोकडविरा येथे उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील नवघर,नवघरपाडा,आणि कुंडेगाव गावांमध्ये तसेच येथील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको द्रोणागिरी नोड कार्यालयात या तिन्ही गावच्या ग्रामस्थांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असता येथील सिडको कार्यालयात जमलेल्या नवघर,नवघरपाडा आणि कुंडेगावच्या ग्रामस्थांनी आपल्या गावच्या आणि परिसरातील समस्यांचा पाढाच सदर सिडको अधिका-या समोर वाचून दाखवला. येथील नागरिकांनी अनेक मुलभूत सुविधा आणि आता पावसाळ्यात नव्याने उद्भवू शकणा-या समस्या सदर सिडको अधिकारी संजय पाटील यांच्या समोर मांडल्या.या मध्ये श्री.आसरा देवीच्या तलावाच्या सुशोभीकरणाचा तसेच पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन समस्येवर सिडकोच्या अधिका-यां सोबत सकारात्मक चर्चा होऊन श्री आसरा देवी तलावाचे सुशोभीकरणासाठी ६ ते ७ लाखाचा निधी देण्याचे कबूल केले आहे. तसेच समाज मंदिर आणि व्यायामशाळा बांधण्यासही सिडको कडून निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून नवघर गावातील इतर कामे जशी नवघर गावच्या आतील रोडचे काम तसेच घनकचरा उचलणे व त्या कच-याचे विल्हेवाट लावणे, इत्यादी कामे तसेच नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये आणि परिसरातील आवश्यक असणारी जनहिताची तसेच पावसाळ्यात अचानक उद्भवणारी कामेही करून देणार आसल्याचे सदर सिडकोचे अधिकारी संजय पाटील यांनी सदर बैठकीला उपस्थीत असणा-या नवघर, नवघरपाडा आणि कुंडेगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर कबूल केले असता येथील  जमलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !! उरण दि १८ (विठ्ठल म...