Sunday 5 March 2023

वन्यजीवांच्या तस्करी व हत्येचा, रात्रीच खेळ चाले ....पण वनजागरातून उजाडत आहे !

वन्यजीवांच्या  तस्करी व हत्येचा, रात्रीच खेळ चाले    ....पण वनजागरातून उजाडत आहे !

जागतीक वन्यजीव संरक्षण दिवस (3 मार्च) 

अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व जैवविविधता संवर्धक, अभ्यासक डॉ. संतोष पाटील

सोयगाव, दिलीप शिंदे - नुकताच ट्रॅफिक इंडिया व डब्ल्यू डब्ल्यू एफ इंडिया वन्यजीवांच्या अभ्यास करणाऱ्या संस्था द्वारे 4 वर्षांतील खवले मांजर तस्करीच्या  चिंता जनक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्या नुसार 1203 खवले मांजर तस्करी साठी पकडण्यास आलेचे निदर्शनास आले आहे.महाराष्ट्र यात दुसऱ्या स्थानी असून 135 पेंगोलिन जप्त  खवले मांजर चोरट्यांनी  वन क्षेत्रात पकडले होते व ते जप्त करण्यात आले. अनेक पेंगोलिन ची हत्या करण्यात आली व त्यांचे अवयव जप्त करण्यात आले. काहिची चीन व व्हिएतनाम मध्यें तस्करी करण्यात आली. गत वर्षी अजिंठा डोंगर रांगेत खवले मांजर तस्करी ची 3 प्रकरणे, 8 बिबट्यांची  विविध कारणांनी हत्या, रानडुक्कर शिकारीची 3 प्रकरणे, 2 वर्षापूर्वीचे पळशीचे जंगलातील हरीण मारणेचे प्रकरण, उंडनगाव येथील मोराची मांसा करिता हत्या, घोरपड विक्री ची व तितर, लाहोरो, सायाळ, ससे आदी वन्यजीवांच्या हत्ये मुळे अजिंठा डोंगर रांगेत वन्यजीव तस्कर किती सक्रिय आहेत हे लक्षात येते. आंतरराष्ट्रीय तस्करांनी सह्याद्री, सातपुडा येथे तुळणेत टाइट फिल्डींग असल्याने, वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या अजिंठा डोंगर रांगेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे व यास स्थानिकांचा सहभाग वेळोवेळी निदर्शनास आला आहे. या व्यापाराचे केंद्र शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भाटपुरा परिसरात असल्याची माहिती  वनविभागास वन्यजीव रक्षकांनी  कळवलेली आहे. 

रात्रीच खेळ चाले-जो अभ्यास वन्यजीव अभ्यासक, वन विभागाचे तज्ञ लोकांचा असतो तोच अभ्यास तस्कर, शिकारी यांचा पण असतो कारण  कोणता वन्यजीव कुठं अधिवास करतो, त्याचा विष्टे वरून माग काढला जातो. खवले मांजर, ससा, सायाळ, मुंगूस, घोरपड या प्राण्यांचे स्वतंत्र व वेगवेगळ्या पद्धतीचे जमिनीत बिळ असतात. कोणते बीळ कोणत्या प्राण्याचे, याचे परिपुर्ण ज्ञान शिकारी लोकांना असते. प्राण्यांच्या विष्टे वरून ही ते माग काढतात. वरील सर्वच प्राणी हे रात्री च बिळातून शिकारी साठी, अन्न पाण्याच्या शोधात बाहेर पडतात व वाघरु जाळ्याच्या मदतीने ही शिकार केली जाते. बिबट्या हाही रात्रीच अन्न पाण्याच्या शोधात  बाहेर पडत असल्याने याची ही रात्रींच विषबाधा करवून मारल्याच्या अनेक घटना अजिंठ्याच्या डोंगरात या वर्षात घडल्या आहेत. रान डुक्कर, सायाळ, मुंगूस, खवले मांजर, ससे, वन्यजीवांच्या  शिकारी ही रात्रीच घडत असून, बरेचसे साप हे घुशी व बिळातून बाहेर पडतात व सापाची कातडी साठि हत्या होते. मुंगूसाच्या केसांपासून ड्रॉइंगचे महागडे स्ट्रोक ब्रश बनवून  विकले जातात. व्यवसायिक चित्रकार ते वापरतात. सायाळचा मांसासाठी व अघोरी कृत्य करणे साठि वापर केला जातो. खवले मांजर या अति संरक्षित वन्यजीव अंगावरील खवले-स्केल साठि तस्करी होते. 

*रात्रीच खेळ ...पण उजाडत आहे*- 

*सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व जैवविविधता संवर्धक, अभ्यासक डॉ. संतोष पाटील हे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी 12 वर्षांपासून वन जागर  या उपक्रमाद्वारे डोंगरी भागात व जळगाव व छ. संभाजी नगर जिल्ह्यात जनजागृती करून स्थानिकांना वन्यजीवांचे महत्व पटवून देत आहेत. 50  हुन अधिक शाळांत व गावात ग्रीन वॉरीयर बनवून वन्यजीवांच्या संरक्षणाचे काम करून, शासन दरबारी पाठ पुरावा करणे, वन्यजीवांच्या अधिवसाला जपण्याचे कार्य ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन करत  असल्याने या अंधारावर मात करत उजाडत असल्याचे दिसत आहे. 8 महिन्यात खवले मांजर तस्करीची एकही घटना या नन्तर घडली नाही वनजागराचे फलित आहे*

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...