Sunday 5 March 2023

सौ.सु.ग.देवकर शाळेचे शैक्षणिक साहित्य निर्मिती व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

सौ.सु.ग.देवकर शाळेचे शैक्षणिक साहित्य निर्मिती व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

जळगाव, प्रतिनिधी — जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती व विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध शैक्षणिक व हस्तनिर्मित साहित्य, विविध प्रतिकृती, विज्ञानाचे प्रयोग, गणितीय प्रतिकृती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्याचे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी निरिक्षण करून कौतुक केले. सदर प्रदर्शनाला शि.प्र.मंडळाच्या विद्या समितीचे प्रमुख प्रा. श्री. शरश्चंद्र छापेकर, शि.प्र. मंडळाचे सदस्य श्री. दिलीपशेठ मुथा, श्री.सचिन दुनाखे, शाळेच्या समन्वयिका सौ. लताताई छापेकर, डॉ. श्रीरंग छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत साखरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन  ** शरद पवार यांच...