Wednesday 29 March 2023

सार्वजनिक सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षकांनी घेतली शांतता कमिटीची बैठक !

सार्वजनिक सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस अधिक्षकांनी घेतली शांतता कमिटीची बैठक ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २९ : आगामी सार्वजनिक सण उत्सव ज्यामध्ये रामनवमी, महाविर जयंती, डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद - 2023  च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मध्यवर्ती शांतात समितीची बैठकीचे आयोजन आज आर्यभट्ट सभागृह, एम.जी.एम. कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी मा. श्री. अस्तिककुमार पांडे सर यांचे अध्यक्षतेखाली व मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, यांचे उपस्थितीत जिल्हातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, माध्यम प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.  

यावेळी शांतता बैठकीस उपस्थित नागकिरांना पैकी मोहंमद कुरेशी, सिल्लोड यांनी शहराचे मुख्य मार्गावरिल बंद असलेले सि.सी.टी.व्ही. कॅमेरे पुर्वरतपणे चालु करणे तसेच नव्याने सि.सी.टि.व्ही. कॅमेरे बसवण्यात यावे. तसेच सिल्लोड येथील चाठे सर, यांनी सांगितले कि, नागरिकांनी स्वयंशिस्तीने कायद्याचे मर्यादा पाळने गरेजेचे असुन मिरवणुका व सण साजरा करतांना पोलीसांना सहकार्य करणे अपेक्षीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. याच प्रमाणे अलिम पठाण यांनी पोलीस ठाण्यात पोलीसांची कुवक वाढवण्या बाबत  प्रश्न मांडला तर रमेश जाधव (माजी सरपंच) शेद्रा यांनी डी. जे. वाजवण्यास परवानगी देण्याबाबत विंनती केली आहे.  

मा. पोलीस अधीक्षक यांनी  आगामी सण-उत्सवाचे अनुषंगाने नागरिकांच्या सुचना समजावुन घेऊन त्या निश्चीत पणे सोडवीण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच जिल्हयात सर्वत्र डी. जे. वाजवण्यास पुर्ण: बंदी असल्याने नागरिकांनी किंवा मिरवणुक संयोजकांनी मिरवणुकी करिता पारंपारीक वाद्यांचा वापर करावा जेणे करून ध्वनी नियंत्रण कायद्याचा भंग होणार नाही. 

सध्या तरुणाई मध्ये अवैध बॅनरबाजी करण्याचा कल मोठयाप्रमाणावर वाढत आहे. ज्यामुळे धार्मिक भावना दुखावणारे तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे मजुकर प्रकाशित करणे, ते सोशल मिडीयाचे माध्यमातुन स्टेटस ला ठेवणे, पुढे पाठवणे अश्या प्रकारच्या वृत्तीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. स्वत:चा धर्म किंती प्रभावी हा दाखविण्यासाठी तरूण मुलांनमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. ज्यामधुन इतरांच्या धार्मिक भावना दुखाल्या जावुन दोन धर्मात तेढ निर्माण होतात. व यामुळे गावामध्ये तणावयुक्त विस्फोटक वातावरण निर्माण होते.  ज्यामुळे अशा तरूण मुलांचे विरूध्द कायदेशिर गुन्हे दाखल होवुन त्यांचे चारित्र्यावर कायमस्वरूपी गुन्हयाची नोंद केली जाते ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगल्या नोकरी अथवा व्यवसायाची संधीला मुकावे लागते.

यासाठी घरातील जेष्ठ किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी वेळीच अशा तरूण मुलांकडे लक्ष देवुन त्यांचेवर चांगले संस्कार देणे अपेक्षीत आहे. कारण धार्मिक भावना दुखावणे किंवा तसा प्रयत्न करणारी वर्तन करणे हा मार्ग शेवटी विध्वसंकडे घेवुन जाणार आहे. नागरिकांनी शक्य असल्यास महापुरूषांचे नावाने साजरे होणारे सणांचे माध्यमांतुन त्या महापुरूषांचे विचार हे तरूणाई पर्यंत कसे पोहचतील यासाठी प्रयत्नशिल रहावे. त्यांचे मिरवणुकीसाठी जमा होणा-या पैशातुन गावात त्यांचे नावाने अभ्यासिका अथवा समाजपयोगि उपक्रम राबविण्यावर अधिक भर दिल्यास त्यांना तिच खरी श्रध्दांजली/ अभिवादन ठरेल. त्याचे मिरवणुकीत दारू पिवुन धिंगाना घालेने, असभ्य वर्तन करणे, हा एक प्रकारे त्या उत्सवाचा अनादर केल्या प्रमाणे आहे.

महापुरूषांची अथवा धार्मिक मिरवणुक काढतांना स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोधंळ घातल्यास अगर धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करणा-या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवुन त्यांचे विरूध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल तसेच  यामध्ये आयोजकांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांना सुध्दा यामध्ये आरोपी केले जाईल असा कायदेशिर ईशारा दिला आहे.
परंतु आदर्श मंडळांना/ आदर्श मिरवणुक बद्दल पदाधिकारी यांचा बक्षिस व सन्मानपत्रदेवुन त्यांचा कामाचा गौरव सुध्दा करण्यात येणार आहे. याकरिता त्यांना पोलीसांचे अटी व शिर्थीचे पालन करणे अत्यावश्यक असुन डी.जे. ऐवजी पारंपारिक वाद्याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करून त्यांचा अधिका अधिके सहभाग नांेदविणे प्राधान्यक्र राहील.  जिल्हा पोलीस यंत्रणा या सण उत्सवाचे अनुषंगाने सर्तक असुन सर्व पोलीस ठाण्यास मनुष्यबळ वाढवुण देण्यात येणार असुन सर्व मिरवणुक मार्गावर सि.सी.टि.व्ही. कॅमेरा सह, पोलीसही संपुर्ण मिरवणुकीचे व्हिडीओग्राफी करणार आहेत. यासाठी पोलीस ठाणे स्तरावर नागरिकांच्या

शांतात समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत असुन त्यामाध्यमांतुन नागरिकांना मार्गदर्शन करून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवुन गावातील शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेणे बाबत व त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती  देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

तसेच मा. जिल्हाधिकरी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सांगितले कि, कोणताही उत्सव साजरा करतांना समाज चांगला राहिला पाहिजे याचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टी स्विकारून व वाईट गोष्टी सोडुन चांगल्या विचारांनी सकारात्क उर्जाने व शांततेने उत्सव साजरा करावा. यामध्ये महिलांना व मुलींना सण/उत्सव साजरा करतांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशा प्रकारचे वातावरण निर्माण करावे जेणे करून अधिक प्रमाणात महिला/ मुली आनंदाने या उत्सवात सहभाग नोंदवतील तेव्हा आपला हा सण/उत्सव साजरा करण्याचा उद्देश साध्य होईल. आपले सण साजरा करतांना इतर समाजाचे किंवा कोणाचे भावना दुखावणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.  बहुतांश नागरिक हे कायद्याचे पालन करतात परंतु 2/4 टक्के लोक हे उदंड, नकारात्क असतात अशा लोकांना नियंत्रणात ठेवण्याचे काम हे पोलीसांचे आहे. गावातील जेष्ठ नागरिकांनी तरूण मुलांना चांगल्या भविष्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. समाजातील दोन पिठयामध्ये चांगले प्रबोधनात्क सुसंवाद असल्यास समाज हा प्रगतीच्या दिशने वाटचाल करतो वाईट मार्गाने गेल्यास त्यांचा शेवट हा विदारक असतो. यासाठी नागरिकांनी आदर्श आचारण ठेवणे गरजेचे आहे.

सध्या जिल्हयात महापुरूषांचे रात्रीमधुन अवैधपणे विना परवानगी अनाधिकृतपणे पुतळे बसविण्याचे प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. प्रशासनाच्या संयमी भावनेचा गैर फायदा घेण्यात येत आहे. पण यापुढे अनाधिकृत पुतळा बसविण्याच्या प्रवृत्तीला कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असा गंभीर इशार सुध्दा यावेळी दिला आहे.
 
 या बैठकीचे सुत्रसंचलन श्री. डॉ. विशाल नेहुल उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले असुन बैठकीस सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,प्रभारी अधिकारी, शाखा अधिकारी, यांचे सह 300 ते 350 जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे  डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पू...