कोचरी माचाळ रस्त्याच्या कामावर आतापर्यंत ५९८.१३ लक्ष रुपये इतका निधी खर्च ; सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांची माहिती !
लांजा, प्रतिनिधी - तालुक्यातील कोचरी माचाळ रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असताना सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांच्या सततच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर काम मंजूर होऊन रस्त्याचे काम आता पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत कोचरी माचाळ रस्ता ता.लांजा कि.मी.०/० ते ९/७०० रस्ता सुधारणा व डांबरीकरण करून बारमाही वाहतुकीसाठी तयार करणे पॅकेज क्र. RD- RAT-११ या कामाचा कार्यारंभ आदेश दि. ०२/०३/२०१९ रोजी कार्यकारी अभियंता ग्रामीण रस्ते विकास संस्था, रत्नागिरी यांनी संबंधित कामाच्या ठेकेदाराला दिला होता.
त्यानुसार सध्या कोचरी माचाळ रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून पूर्ण झाले असून या रस्त्यावरील लांबी ९.७०० कि.मी पैकी GSB - ८.११४ कि.मी.GII- ४.९८७ कि.मी.MPM-५.०० कि. मी CC pavement-७.१६० मी.एवढे काम सध्या पूर्ण आहे त्यामध्ये मोरी बांधकाम ३३ पूर्ण व १ बाकी असून या कोचरी माचाळ रस्त्याच्या बांधकामावर रक्कम रुपये ५९८.१३ लक्ष इतका निधी आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांनी सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांना दिली.
No comments:
Post a Comment