धावत्या एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या सराईत चौकडीला अटक ; १० लाखांचा मुद्देमाल जप्त !
भिवंडी, दि, २७, अरुण पाटील (कोपर) :
अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून रात्रीच्या वेळेत किंमती सामान चोरणाऱ्या चौकडीला कल्याण लोहमार्ग गु्न्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईल, दागिने, किंमती सामान असे मिळुन १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रवी दशरथ गायकवाड (२८, रा.पुणे), गणेश सुरेश राठोड (२३, रा.पुणे), प्रकाश आश्रुबा नागरगोजे (२५, रा. पुणे), तानाजी शिवाजी शिंदे (२६, रा.संभाजीनगर) अशी अटक केलेल्या चोरट्याची नावे आहेत. हे आरोपी अहमदाबाद-वसई-पुणे या एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील दागिने, मोबाईल, रोख रक्कम प्रवासी रात्रीच्या सुमारास झोपल्याचा फायदा घेत, प्रवाशांची लूटमार करीत होते.
या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यांचा तपास रेल्वे पोलिसांनी सुरू केला होता. तपासादरम्यान चोरीच्या घटना घडलेल्या रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी काही संशयित चेहऱ्यांची खबऱ्याकडून ओळख पटवली होती.
त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यातून रवी दशरथ गायकवाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या इतर दोन सराईत चोरटे विविध तालुक्यातून आणि एक चोरट्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली. या चारही अटक चोरट्याकडून पाच मोबाईलसह १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment