Saturday, 29 April 2023

अंभई येथे दवाखान्या समोरच तळे साचले रुग्णांचे हाल *ग्राम पंचायत ने लक्ष देण्याची गरज !

अंभई येथे दवाखान्या समोरच तळे साचले रुग्णांचे हाल *ग्राम पंचायत ने लक्ष देण्याची गरज ! 

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि २९ : सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे सलग दोन दिवस मुसळधार पाऊस आहे. यामुळे येथील नागरी दवाखाना परीसरात पाणीच पाणी जमा झाले आहे. 

प्रत्येक वेळेस पाउस पडतो आणि नागरी दवाखान्यासमोर तळे साचते आणि रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी कसरत करावी लागते. ह्या पाण्याची योग्य विल्हेवाट होणे गरजेचे आहे, यामुळे संबंधित ग्राम पंचायत कार्यालयाने याची दखल घेऊन येथील परिसर व्यवस्थित करून पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी अंभई येथील नागरिकांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...