Friday 5 May 2023

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद !

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद !


कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस म्हणजेच 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरातील अ‍ॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी साठा 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुरवण्यासाठी 32 टक्के तूट येत आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये असलेला पाणी पुरवठा लक्षात घेता आणि त्यासोबतच मान्सूनची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता, 9 मे 2023 पासून आठवड्यातील दर मंगळवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीतील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली आणि टिटवाळा), डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...