Friday 5 May 2023

प्रस्तावित आंबिवली मुरबाड रेल्वे मार्गावर बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात !

प्रस्तावित आंबिवली मुरबाड रेल्वे मार्गावर बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात !

*रेल्वेकडून जमिनीचा दामदुप्पट मोबदला मिळविण्यासाठी ग्रामस्थ, दलाल यांचे कारस्थान*


कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गातील आंबिवली ते मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, मोजणीचे काम रेल्वे प्रशासन, शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे. या कामात अडथळे आणून रेल्वेकडून जमिनीचा दामदुप्पट मोबदला मिळविण्यासाठी ग्रामस्थ, दलाल आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी या रेल्वे मार्गात, मार्गालगत बेकायदा निवारे उभारण्याचे काम अधिक प्रमाणात सुरू केले आहे.


कल्याण, मुरबाड तालुक्यातील ओसाड माळरान जमीन, जंगल भागात अचानक मोठ्या प्रमाणात लोखंडी पत्रे, पक्क्या बांधकामांचे निवारे उभारणीची कामे सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही बेकायदा बांधकामे करणाऱ्यांमध्ये ग्रामस्थ, जमीन व्यवहार करणारे मुरबाड, कल्याण भागातील दलाल, काही स्थानिक अधिकारी सहभागी असल्याचे जागरुक ग्रामस्थांनी सांगितले. रेल्वेकडून मजबूत मोबदला मिळत असल्याने मुरबाड परिसरातील दलालांनी स्थानिक शेतकऱ्यांना हाताशी धरून प्रस्तावित आंबिवली-मुरबाड रेल्वे मार्गात बांधकामे आहेत हे दाखविण्यासाठी पत्र्यांचे निवारे उभारण्याची कामे हाती घेतली आहेत.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...