१ मे कामगार दिनानिमित्त भाजपा कामगार मोर्चातर्फे कामगारांचा सत्कार !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ : आज सोमवार दि.१ मे रोजी छ. संभाजीनगर शहरातील भाजपा कार्यालयात 151 कामगारांचा, कामगार दीन व महाराष्ट्र दिनानिमित्त सत्कार प्रमाण पत्र , मिठाई, गुलाबाचे फुल देऊन करण्यात आला.
हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या, कामगार मोर्चातर्फे घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन कामगार मोर्चाचे अध्यक्ष शेख हफिज यांनी केले होते, या कार्यक्रमाला माजी महापौर बापू घडामोड, कामगार मोर्चाचे सरचिटणीस साहेबराव निकम, संजय पाटील, अत्तहर खान, मंडळ अध्यक्ष अजय शिंदे,मुकुंद लाडकेकर, ज्योती हापसे, शेख खातून बाजी, संगीता कांबळे, शेख मुनीर पटेल, संजय पाटील, लक्ष्मण निकम, राज बुंदिले, मिलिंद खैरे, संतोष खरात, सुभाष वाघमारे, राजू वाठोरे व सोनू कागडा आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment