बोरिवली पश्चिम येथील ‘मुंबई युथ असोसिएशन (एन.जी.ओ.) ’समूहातर्फे गरजू महिलेला मदतीचा हात !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील भांबेड येथील एका गरजू विधवा महिलेला बोरिवली पश्चिम येथील ‘मुंबई युथ असोसिएशन (एन. जी. ओ.)’ समूहाचे अध्यक्ष श्री. वैभव दामोदर म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभाग प्रमुख श्री. दामोदर म्हात्रे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा प्रमुख सचिन दामोदर म्हात्रे यांच्या तर्फे सन २०२२-२३ दरम्यान सुरु असलेल्या गं.भा.सुनंदा का. शिवगण यांच्या घरासाठी आवश्यकता असलेले सिमेंट पत्रे देऊन मदतीचा हात दिला. त्यामुळे या गरजू महिलेच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत मिळाले आहे. या मदत कार्यासाठी बोरिवली पश्चिम येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना जनसंपर्क अधिकारी श्री. समीर वि. खाडिलकर यांनी विशेष सहकार्य करून मदत मिळवून दिली. भांबेड येथील गं. भा.सु.का. शिवगण या गरजू महिलेच्या पतीच २ वर्षांपूर्वी निधन झाले होते.पतीच्या निधनानंतर या विधवा महिलेने अथक काबाडकष्ट करीत आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही स्वत:च्या पोटाला चिमटा काढून स्वतःचे चांगलं घर उभं करण्याचा प्रयत्न केला.अनेक अडचणी येत असतानाही हातात असलेल्या पैशात पक्क्या भिंती उभ्या केल्या. मात्र आवश्यकता असलेले सिमेंट पत्रे साठी तिला मदतीची गरज भासत होती. तिची गरज लक्षात घेऊन स्थानिक जागृत नागरिक यांनी पत्रकार समीर खाडिलकर यांच्याशी संपर्क साधला. कारण कोरोना काळात समीर खाडिलकर यांनी अनेकांना अनेकदा मदत केली होती. समीर खाडिलकर यांनी म्हात्रे कुटूंब यांच्याशी संवाद साधून आवश्यकता असलेल्या सिमेंट पत्रे विषयी माहिती दिली. म्हात्रे कुटुंब यांनी तात्काळ होकार देऊन पत्रे दिले.
प्रत्येक धर्मात दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सनातन धर्मातही दानाचे महत्त्व सांगितले आहे.असे मानले जाते की दान केल्याने मनुष्याचे इहलोक आणि परलोकात कल्याण होते. पण आजच्या बदलत्या काळात लोकांसाठी कोण काही करताना दिसत नाही. मात्र म्हात्रे कुटुंब याला अपवाद आहे. ते जमेल तेथे सातत्याने मदतीचा हात लोकांना देत आहेत. पुण्य कार्यात धर्मादाय कार्याची भर पडते. भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आली आहे. म्हात्रे यांनी केलेल्या या मदत कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना अनेकांनी पुढील कार्यास यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment