Thursday, 1 June 2023

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस !!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस !!

नालासोपारा, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांचे वडील श्री भगवान महादेव सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त नालासोपारा येथे महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेसचे उध्दघाटन करण्यात आले.

महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर कोर्सेस समेळपाडा येथे  सुरू करण्यात आला आहे. प्रशिक्षण पुर्ण करणारया महिलांना  प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.

हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला  नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने हे कोर्सेस सुरू करण्यात आले आहे.

यावेळी जिजाऊ संस्थेचा तालुकाप्रमुख हर्षाली खानविलकर, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, महिला आघाडी शहर संघटक वंशिका नर, महिला उपशहर संघटक आशा सातपुते व स्थानिक महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा शशिकांत धावडे हिचे सन २०२४-२५ मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५वी) अत्युच्च यश !!

जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा शशिकांत धावडे हिचे सन २०२४-२५ मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प...