Monday, 26 June 2023

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गुन्हेगारांना अटक करून १४ गुन्ह्याची उकल करत १३ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत !!

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गुन्हेगारांना अटक करून १४ गुन्ह्याची उकल करत १३ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत !!

भिवंडी, दिं,२७,अरुण पाटील (कोपर)
          भिवंडीत धूम स्टाईलने मोटारसायकल वरून सोनसाखळी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल सोनसाखळी चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असता चौकशीत त्यांनी तब्बल १४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
          भिवंडी परिमंडळ_२  मधील १२ गुन्ह्यासह ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यातील २ गुन्हे मिळून, एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले. १३ लाखाचा सोन्याचा ऐवज भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केला आहे. भिवंडीतील गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस गस्त घालीत असताना, भिवंडी _कल्याण मार्गावरील साईबाबा मंदिरा समोर वेगात दुचाकीने भिवंडीकडे जाणारे दोन संशयित व्यक्ती आढळले.
        तेव्हां त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दोघे शहरातील शांतीनगर पिराणीपाडा येथे राहणारे असून त्यांची नांवे मोहझम नवाज शरीफ अन्सारी (२८) व नियाज अहमद हुसेन शेख (३२) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून अधिक तपासासाठी  पोलीस कोठडी घेतली आहे.
         सदर आरोपींनी भिवंडी परिमंडळ-२ मधील शांतीनगर पोलीस ठाणे -४, निजामपूर पोलीस ठाणे-२, भोईवाडा पोलीस ठाणे-१, कोन पोलीस ठाणे-१, निजामपूर पोलीस ठाणे-१, शहर पोलीस ठाणे-३ आणि तालुका पोलीस ठाणे मधील-२ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील २६० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यातील दुचाकी तसेच इतर ऐवज मिळून १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.                           
             सद्या त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली. सदर कारवाई गुन्हे शाखेचे सपोनि विजय मोरे, प्रफुल्ल जाधव, धनराज केदार, पोउपनि राजेंद्र चौधरी, निसार तडवी, सपोउनि रामचंद्र जाधव, रविंद्र पाटील, राजेश शिंदे, पोह मंगेश शिर्के, साबीर शेख, रंगनाथ पाटील, सुनिल साळुंखे, शशिकांत यादव, प्रकाश पाटील, देवानंद पाटील, किशोर थोरात, पोना सचिन जाधव, पोशि सचिन सोनवणे,अमोल इंगळे, जालींदर साळुंखे, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, भावेश घरत , महिला पोह माया डोंगरे, श्रेया खताळ या पोलीस पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !! ** नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी  ...