मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर !!
भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील, (कोपर) :
मुकेश अंबानी यांच्या ॲंटेलिया स्फोटक आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट आरोपी असलेला पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याला सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेल्या प्रदीप शर्मा यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा तुरुंगात होते. या आधीही प्रदीप शर्मा यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर प्रदीप शर्मा सर्वोचच न्यायालयात गेले होते.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या बंगल्याबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ आढळली होती. मात्र या घटनेनंतर या स्कॉर्पिओचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू ठाण्याजवळील खाडीत आढळून आला. त्या वेळी या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे या प्रकरणी एनआयएने केलेल्या तपासात या घटनेचे कनेक्शन पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि पोलिस अधिकारी ए.पी.आय. सचिन वाझे यांच्या पर्यंत पोहचले. त्या नंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह 9 जणांना एनआयएने अटक केली. मात्र या प्रकरणात प्रदीप शर्मा यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पुरावे मिटवण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र आता प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment