Tuesday, 29 August 2023

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे !!

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे !!



मुंबई , प्रतिनिधी : रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असून आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुक्ताई शुगर मीलच्या चेअरमन रोहिणी खडसे यांची आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आज पक्षाचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या माध्यमातून त्यांच्यावर राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.

आज मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत रोहिणी खडसे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

दुसरीकडे, बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बीड जिल्ह्यात बबन गिते विरुद्ध धनंजय मुंडे असा अंतर्गत वाद असून त्यामध्ये बबन गिते यांना बळ देण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे    कल्याण, अतुल फडके :     आज उच्च शि...