Saturday 23 September 2023

१ ऑक्टोबर ला चोपड्यास लालबावटा शेतमजूर युनियन (BKMU) चे जिल्हा अधिवेशन !


१ ऑक्टोबर ला  चोपड्यास लालबावटा शेतमजूर युनियन (BKMU) चे जिल्हा अधिवेशन  !

चोपडा, प्रतिनिधी - मुंबई येथे राज्य बैठकीत ठरले प्रमाणे दिनांक 1ऑक्टोबर 2023 वार रविवारी रोजी  चोपडा  येथे सकाळी 11.00वाजता आयोजित केले आहे.

या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड शिवकुमार गणवीर (राज्य सेक्रेटरी लाल बावटा शेतमजूर युनियन , हे असून भारतीय खेत मजदुर युनियन चे राष्ट्रीय कमिटी मेंबर ,का अमृत महाजन  यांचे अध्यक्षतखाली हे अधिवेशन घेणेत येत असून सर्व मान्यवर श्री कॉ. प्रकाश चौधरी (cpm नेते), कॉम्रेड देविदास बोंदार्डे (माजी उपाध्यक्ष शेतमजूर युनियन), कॉ .जे डी ठाकरे (अनिस कार्याध्यक्ष, जळगाव), कॉ. ज्ञानेश्वर पाटील (जिल्हा सचिव भाकप जळगाव) याना निमंत्रित केले  आहे. या अधिवेशनात  गायरान जंगल  जमीन कासणाऱ्यांचे नाबे करा, रोजगार हमी शहरी भागातही लागू करा, मागेल त्याला रेशन कार्ड द्या 14 जीवनावश्यक वस्तू रेशन दुकान मधून मिळाव्यात शेतमजुरांच्या बचत गटांना कामे ध्या, शेतमजुरांना घरासाठी 5 लाख रु ध्या पेन्शन 3000 रु ध्या आदी विविध  समस्यांविषयी चर्चा व ठराव घेतले जाणार आहेत. या अधिवेशनाला  जिल्ह्यातील  बहुसंख्य शेतमजूर बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड प्रल्हाद एरंडे, कार्याध्यक्ष कॉ. लक्ष्मण शिंदे, जि सचिव कॉ गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, कॉ. शांताराम पाटील, कॉ. बाळू लोहार, इरफान मण्यार, अरुणा काळे, अंबालाल राजपूत, जीजाबाई राणेराजपूत, सुमती वारके, प्रेम सिंग, बरेला बंटी,  पावरा, रामसिंग पावरा, संतोष कुंभार, बाळू कोळी, कौतिक कोळी, विश्वास पाटील शेतमजूर युनियन चे पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ! मुंबई (शांताराम गुडेकर) :            परमपूज्य श्री स...