Tuesday 5 September 2023

कुणबी समाजोन्नती संघ, विलेपार्ले शाखेतर्फे सन २०२३-२०२८ कालावधीसाठी कार्यकारणी जाहीर !!

कुणबी समाजोन्नती संघ, विलेपार्ले शाखेतर्फे सन २०२३-२०२८ कालावधीसाठी कार्यकारणी जाहीर !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                कुणबी समाजोन्नती संघ,मुंबईच्या  विलेपार्ले शाखेतर्फे सन २०२३-२०२८  या कालावधीसाठी नुकतीच  कार्यकारणी नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा, संकल्प सिद्धी सोसायटी, हनुमान रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७, येथे पार पडली. सुरुवातीला महेश पारदुले यांनी कुणबी समाजोन्नती संघ व त्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या सभेला संघ प्रतिनिधी म्हणून श्री.रमेश कानावले उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत पद नियुक्ती कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाखा अध्यक्ष- महादेव शितप, उपाध्यक्ष- विजय बाईत व प्रकाश गार्डी, सचिव- महेश पारदुले, सहसचिव- प्रतीक कानावले, प्रकाश सांडम व विजय सुर्वे, खजिनदार- श्याम धनावडे, सहखजिनदार- मारुती जड्यार व प्रकाश गाडे, सल्लागार- दत्ताराम नामे व गोविंद धनावडे, उद्योजक समिती अध्यक्ष- संभाजी चांदे, सांस्कृतिक समिती अध्यक्ष- रोमेश पडेलकर,ऑटो रिक्षा संघटन समिती अध्यक्ष- प्रकाश सांडम, मुख्य प्रवर्तक विलेपार्ले शाखा- रमेश कानावले, विलेपार्ले शाखा संघ प्रतिनिधी- महेश पारदुले, सदस्य/संघटक-शशिकांत सलपे, केशव पुजारे, सुरेश कानावले, रत्नाकर ठोंबरे, भिकू बाईत यांचा समावेश आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्य, संघटक तसेच या सभेला उपस्थित संघ प्रतिनिधी यांना अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
              या सभेला संबोधित करताना, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.महादेव शितप यांनी सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन शाखेचा नावलौकिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले. प्रवर्तक श्री. रमेश कानावले यांनी या निमित्ताने बोलताना आश्वास दिले की, जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्याल, तेव्हा तेव्हा मी हजर असेन.श्री.सुरेश कानावले यांनी सर्वांचे आभार मानून सभेची सांगता केली.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...