Tuesday 5 September 2023

शिक्षक दिनाच्या निमित्ताने म्हारळ, गोवेली, खोणी व सोनारपाडा केंद्रातील जिप शिक्षकांचा संपर्क फाऊंडेशन तर्फे कल्याण पंचायत समितीत गौरव !!

शिक्षक दिनाच्या निमित्ताने म्हारळ, गोवेली, खोणी व सोनारपाडा केंद्रातील जिप शिक्षकांचा संपर्क फाऊंडेशन तर्फे कल्याण पंचायत समितीत गौरव !!

कल्याण, (संजय कांबळे) : विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संपर्क फांऊडेशन या संस्थेच्या वतीने कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात गटशिक्षणाधिकारी डॉ रुपाली खोमणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मात्र याबाबत प्रशासनाचे प्रमुख तथा गटविकास आधिकारी अशोक भवारी यांना प्रतिक्रिया विचारली असता आपणास या बाबत काही माहिती नाही, असा कोणताही कार्यक्रम झाला आहे किंवा नाही हे  मला अवगत  नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने व ते अनभिज्ञ असल्याने प्रशासनातील सावळागोंधळ व समन्वयाचा अभाव समोर आला आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न तत्वज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर जयंती दिन संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवल परिसरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संपर्क फांऊंडेशन या संस्थेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना 'संपर्क फांऊंडेशन ॲवार्ड देऊन सन्मानित करणाचा कार्यक्रम कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी तालुक्यातील म्हारळ केंद्राततून केंद्र प्रमुख विभावरी राणे, सहशिक्षिका लता राणे, जिल्हा परिषद शाळा कांबा, गोवेली दिनानाथ दुधसागरे, सहशिक्षिका वृषाली गांगुर्डे, आपटी,  सोनारपाडा हर्षद खंबायत, सहशिक्षिक सुनील शिगांडे  नांदिवली पाडा तर खोणी केंद्रातील केंद्र प्रमुख गजेंद्र वेखंडे, आणि सहशिक्षिका मिनाशी देशमुख आदी जिप शिक्षक व शिक्षिका यांना सन्मान चिन्ह देऊन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ रुपाल खोमणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संपर्क फांऊंडेशन चे राज्य प्रमुख उल्हास शहा, मयुरी  कुलकर्णी, राज्य संचालन व्यवस्थापक, संगीता रासमवार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक,, यांच्या सह शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, क्लार्क व इतर कर्मचारी उपस्थित होते. मात्र प्रशासनाचे प्रमुख तथा गटविकास अधिकारी या बाबतीत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. शिवाय तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२० शाळा आहेत या शाळेतून सुमारे ४००/ ४५० च्या आसपास शिक्षक अध्यापनाचे काम करतात, त्यामुळे इतरांचे काय? त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालेल का? यामुळे इतर शिक्षकामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही का? याचा विचार कोणी करायला हवा?

आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील शिक्षकांचा गौरव झाला ही चांगली व अभिमानाची बाब आहे, फाऊंडेशन च्या माध्यमातून ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांना ६६३ संपर्क टिव्ही, डिव्हाईस, तसेच १५० टिव्ही, देण्यात आल्या पैकी ८८ डिव्हाईस कल्याण तालुक्यात दिल्या ही खरेच चांगली घटना आहे. पण सदरचा कार्यक्रम हा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात झाला म्हणजे तो अधिकृत झाला, मात्र याची कल्पना प्रशासनाचे प्रमुख असलेल्या गटविकास अधिकारी यांना असू नये किंवा त्यांना ती देण्यात येवू नये, याचा अर्थ कल्याण पंचायत समितीच्या प्रशासनात सावळागोंधळ व समन्वयाचा  अभाव आहे हे स्पष्ट लक्षात येते. हे तालुक्यासाठी भूषणावह नाही. याचा विचार करायला हवा. तर आपण याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...