Tuesday 5 September 2023

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे - अभिजित कदम

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे - अभिजित कदम

जव्हार, जितेंद्र मोरघा :
                                     
मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अभिजित कदम (मोखाडा नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी ) म्हणाले की, मी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक होतो. त्यामुळे शिक्षकांचे कार्य काय आहे ते मला माहिती आहे शिक्षक हे नेहमी कामाचा मोबदला घेत नसून जबाबदारीचा  मोबदला घेतात असेही ते म्हणाले. आज मी कार्यकारी अधिकारी म्हणून जे कार्य करतो ते शिक्षकांमुळे म्हणूनच विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन यावेळी  अभिजित कदम यांनी केले. आणि शेवटी त्यांच्या शिक्षकाने सांगितलेली शिक्षणाची व्याख्या सांगितली 'शिक्षण हा त्यांच्या शिक्षकांनी  प्रश्नापासून उत्तरापर्यंत शोधण्याचा प्रवास  म्हणजे शिक्षण होय.'

कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉ. एल डी. भोर   हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे, सामाजिक विकासाचे साधन आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे, शिक्षक हा विद्यार्थीप्रिय असला पाहिजे व शिक्षकांच्या कार्यातून एक आदर्श कार्य दिसले पाहिजे असे आव्हान यावेळी उपस्थित प्राध्यापकांना केले.
 
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. एस. आर. व्हनडे व डॉ. वाय. एच. उलवेकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. मेंगाळ व प्रा. एस. ई. सैंदनशिव, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे फुल पुष्प देऊन प्रमुख पाहुणे मा. अभिजित कदम यांनी सर्वांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...