Tuesday 5 September 2023

जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

पुणे, प्रतिनिधी : जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज दि. ५ सप्टेंबर २०२३ शिक्षकदिनी दहीहंडी तसेच आजी - आजोबा मेळावा अतिशय जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे संचालक श्री. मनोज पाटील सर व सौ. सीमा पाटील मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोकेश चौधरी सर  व सौ. मनीषा धबाडे मॅडम व्यासपीठावर  उपस्थित होत्या. 
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. शिक्षक दिन प्रसंगी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदरांजली म्हणून समूह नृत्य व गीते सादर केली.
     आजी- आजोबा मेळावा अंतर्गत सर्व उपस्थित आजी आजोबांचा कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर छोट्या मुलांनी कृष्णाची भूमिका साकारल्या होत्या व दहीहंडी फोडण्यात आली. शाळेचे विद्यार्थी आज शिक्षक भूमिकेत आले होते व त्यांनी उत्कृष्ट शाळा सांभाळली.
        सर्व शिक्षकांच्या  सहकार्याने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्वांच्या उपस्थितित कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...