Tuesday 5 September 2023

संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग उपाध्यक्षपदी श्री.महेंद्र मनवे यांची नियुक्ती !!

संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग उपाध्यक्षपदी श्री.महेंद्र मनवे यांची नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा.ना. श्री.सुनिलजी तटकरे आणि संगमेश्वर चिपळूण विधानसभा लोकप्रिय आमदार मा.ना. श्री.शेखर गोविंदराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्याचे मुंबई विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क प्रमुख श्री. सुरेश घडशी यांच्या नेत्रुत्वाखाली आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते मुंबई येथे निकम यांच्या चुनाभट्टी येथील निवासस्थानी श्री.महेंद्र मनवे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.हे पत्र स्वीकारताना गावकर  एकनाथ मनवे, तानाजी मनवे, मोहन मनवे, गोपाळ मनवे, शांताराम घाणेकर, अशोक तांबे ,प्रदिप जोशी, वसंत मनवे, चंद्रकांत घाणेकर, प्रमोद जोगळे, विलास मनवे मौजे असुर्डे मनवेवाडी मधील तसेच गुरववाडी /मधली मनवे गावगावकरी मंडळी तसेच महेंद्र मनवे यांच्यावर नितांत प्रेम करणार मित्रपरिवार त्याच बरोबर धामणी जोगळेवाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

          यापूर्वी महेंद्र मनवे यांनी सतत ४ वर्षे कार्यकर्ता म्हणुन आमदार शेखर निकम यांचे अत्यंत जवळचे त्याचबरोबर सरांचे एक विश्वासू कर्तबगार व्यक्ती म्हणुन जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडलेले आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये संघटन कार्य जोमाने सुरू ठेवून सर्वसामान्यांचे कामे पार करण्याचे महत्त्वाची भूमिका आपण यापुढे तशीच चालत ठेवू. पक्षाने दिलेली जबाबदारी स्विकारून काम करत राहो अशी प्रतिक्रिया तालुका उपाध्यक्ष श्री. महेंद्र मनवे यांनी नियुक्ती पत्र स्वीकारताना मत व्यक्त केले. संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग उपाध्यक्षपदी श्री.महेंद्र मनवे  यांची नियुक्ती झाल्याबद्दल संगमेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील अनेक समाज संघटना, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मंडळी यांनी महेंद्र मनवे यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...