Wednesday 6 September 2023

कोकणातील कलाकारांच्या न्याय हक्कासाठी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि नमन लोककला संस्था एकजुटीने सज्ज !!

कोकणातील कलाकारांच्या  न्याय हक्कासाठी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि नमन लोककला संस्था एकजुटीने सज्ज !!

ठाणे, उदय दणदणे :

कोकणातील कलगी- तुरा व नमन लोककलेचं जतन संवर्धन व्हावं त्याच बरोबर तिला राजमान्यता मिळावी यासाठी सदर लोककलांच्या मातृसंस्था कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुबंई व नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड- भारत ह्या संस्थाच्या वतीने गेली अनेक वर्षे शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. कोकणातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा कोकणातील ह्या लोककला व लोककलावंतांच्या व्यथा मांडल्या गेल्या आहेत, लोकप्रतिनिधींनी ह्या व्यथा राज्यसभेत मांडल्या मात्र अजुनही ह्या लोककलांना व लोककलावंतांना राजाश्रय मिळत नसल्याने कलगी- तुरा व नमन ह्या लोककलांच्या मातृसंस्थानी भविष्यात संयुक्तिकरित्या संविधानिक मार्गाने न्यायिक लढा संघर्षसासाठी एकत्रित आले आहेत. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ - मुंबई (मातृ मंडळ) आणि नमन लोककला संस्था - भारत या दोन रजिस्टर संस्था हातात हात घालून आता एकजुटीने या कामाला लागल्या आहेत. या ऐतिहासिक निर्णयाची दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता,सोशल लीग सर्विस हायस्कूल ( दामोदर हॉल) परेल मुंबई - १२, येथे दोन्ही संस्थांची संयुक्तरीत्या कलगी तुरा मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे  आणि नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण मीटिंग घेण्यात आली. 

सदर मिटिंगला उपस्थिती दोन्ही संस्थाच्या पदाधिकारी यांचे स्वागत संतोष धारशे यांनी केले, तर रविंद्र मटकर आणि अनंत तांबे यांनी नियोजित मिटिंग बद्दल सविस्तर माहिती उपस्थित दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी सदस्य यांना दिली.

दोन्ही संघटनांनी शासन दरबारी या दोन्ही लोककलांना सर्वार्थाने न्याय मिळवून देण्याकामी एकत्रित येऊन काम करण्याचा दोन्ही कार्यकारणी मंडळांनी ठराव केला असून पुढील चळवळीसाठी दोन्ही संघटनांची आचार संहिता निश्चित करून संयुक्तरीत्या सर्वांनुमते दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी यांची एक "कोर कमिटी" नियुक्त करण्यात आली आहे, त्यात अनंत तांबे, रवींद्र मटकर,संतोष धारशे, सुधाकर मास्कर, शहीद खेरटकर, दिलीप नामे, चंद्रकांत धोपट, दिपक म्हादे, रमाकांत जावळे, विकास लांबोरे तर प्रचार प्रमुखपदी -पत्रकार उदय दणदणे आणि पत्रकार दिपक कारकर यांची निवड करण्यात आली. सदर सभेला सत्यवान यादव सुभाष बांबरकर, प्रशांत भेकरे, सुरेश चिबडे, सतिश जोशी, प्रवीण कुळये, अनंत मुंगळे, सुनिल मोगरे, संतोष पारदले, इत्यादी दोन्ही संस्थांच्या कार्यकारणीतील सदस्य /पदाधिकारी उपस्थित होते. सदर न्यायिक लढ्यामध्ये स्वेच्छेने अन्य संस्था सामील होणार असतील तर त्यांचे स्वागतच असेल असे सदर कोरकमिटीचे प्रमुख अनंत तांबे व रवींद्र मटकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...