Wednesday 6 September 2023

वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप !!

वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
           वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे संस्थापक/अध्यक्ष मा.डॉ. अविनाशजी सकुंडे यांच्या सूचनेनुसार व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ (WHRAF) चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते तसेच AIACPC चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या नियोजनाने संघटनेच्या वतीने प्रगती क्रीडा मंडळ प्रभादेवी येथे विभागातील गोरगरीब व गरजू ८ वी, ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या व गुलाब पुष्प वाटप करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल वंजारे,कार्यक्रमाच्या आयोजिका महाराष्ट्र सचिव ज्योतीताई भोसले, WHRAF चे मुंबई सहसचिव साक्षत मात्रे, सुनील सकपाळ तसेच प्रगती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कांबळे, सचिव दत्तात्रय बाईट, सल्लागार तुळशीराम कोठेकर, राजा घाणेकर, दशरथ किर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...