Monday 4 September 2023

जालन्यातील मराठा समाजावरील लाठीचार्ज च्या विरोधात पुकारलेल्या कल्याण बंद ला संमिश्र प्रतिसाद !

जालन्मयातील मराठा समाजावरील लाठीचार्ज च्या विरोधात पुकारलेल्या कल्याण बंद ला संमिश्र प्रतिसाद !


कल्याण, (संजय कांबळे) : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवावर केलेल्या अमानुष पोलीस लाठीचार्ज विरोधात पुकारलेल्या 'कल्याण बंदला, संमिश्र प्रतिसाद' मिळाला आहे,
महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील अतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी समाजाचे मनोज जरांगे पाटील यानी आमरण उपोषण सुरू केले होते. 

या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा आला व येथील परिस्थिती बिघडली व येथील जमावावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याचाच एक भाग म्हणून काल कल्याण मध्ये मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात टरबूज पायाखाली तूडवून सरकारचा निषेध नोंदवला व आज सकल मराठा समाजाच्या आज कल्याण बंदचे अवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज कल्याण, मुरबाड, महामार्ग, कल्याणातील शिवाजी चौक, पुष्पराज हाँटेल, सुभाष चंद्र बोस चौक, बिर्ला गेट, पत्रीपुल परिसरात काही दुकाने बंद होती, रस्त्यावर रिक्षा, व इतर वाहने काला पिला गाड्या, आदी वाहनांची संख्या कमी अधिक प्रमाणात दिसत होत्या. मराठा समाजाचे काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकांना बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन करत होते. यावेळी काही रिक्षाचालक व कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची व खटके उडत होते. नेहमी गजबजलेला छ. शिवाजी महाराज चौकात आज शुकशुकाट दिसत होता.
कल्याण, टिटवाळा, मोहना,आदी ठिकाणी आजच्या बंदला काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

कल्याण शहरासह ग्रामीण भागात आजच्या कल्याण बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...