Sunday 3 September 2023

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबूरतर्फे आनंद नगर चेंबूर येथील विशेष मुलांच्या मराठी शाळेत साहित्य वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबूरतर्फे आनंद नगर चेंबूर येथील विशेष मुलांच्या मराठी शाळेत साहित्य वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            मुंबई सह उपनगर, कोकण विभागात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) आर.सी.एफ चेंबूर तर्फे आनंद नगर चेंबूर येथील महानगरपालिका विशेष मुलांच्या मराठी शाळेत साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच चेंबूर येथे पार पाडला. 

             या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीमती नजहत शेख (वित संचालक, आर सी. एफ), श्री.संतोष शिकतोडे (उप अभियंता, नवी मुंबई), श्री.अश्विन कांबळे (मुख्य  प्रबंधक आर सी. एफ), मनीष कुमार (निरीक्षक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल), श्रीमती वर्षा जोशी (उप व्यवस्थापक आर. सी. एफ), श्रीमती अनुराधा मॅडम (मुख्य व्यवस्थापक आर सी. एफ ), रुपाली वाधवाणी, विनायक जोशी, हर्षाली शिंदे यांच्या सहित मंडळ अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव -प्रदीप गावंड, उप अध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार सचिन साळुंखे, वैभव घरत, स्नेहा नानीवडेकर, नीलम गावंड, हनुमंता चव्हाण, प्रकाश शेजवळ, डी. एम. मिश्रा, संतोष नाईक, सचिन पाटील व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते  विद्यार्थ्यांना विनामूल्य लोखंडी कपाट, हायजीन किट, स्टेशनरी, कॅम्पुटर ट्रॅली, खुर्च्या, हस्तकला साहित्य, स्वच्छता साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.

           पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर आर सी एफ तर्फे गेल्या १६ वर्षाहून अधिक काळात समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत आहे. मंडळाचे कार्यतत्पर अध्यक्ष गुणवंत कामगार श्री.अशोक भोईर व सहकारी प्रामुख्याने आदिवासी,अंध विकलांग , वृद्धाश्रम यांना सर्वतोपरी सहाय्य करते . गरीब गरजूंसाठी निशुल्क मेडीकल कॅम्प ,नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अन्नधान्य , कपडे,गृहोपयोगी वस्तू,औषधे,वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ  गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाला मदतीचा हात देत गेली  अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष - अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड - खजिनदार  , संतोष नाईक ,  डि.एफ. निंबाळकर ,सहसचिव वैभव घरत,सौ. स्नेहा नानीवडेकर,सल्लागार हनुमंता चव्हाण,सदस्य नीलम गावंड,मॅथ्यु डिसोझा आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...