Sunday 3 September 2023

पत्रकारांच्या बातमीचा 'झटका, कल्याण मुरबाड मार्गावरील अनाधिकृत पार्किंग गायब !

पत्रकारांच्या बातमीचा 'झटका, कल्याण मुरबाड मार्गावरील अनाधिकृत पार्किंग गायब ! 

*नागरीक व वाहनचालकांकडून पत्रकार कांबळे यांचे आभार*

कल्याण प्रतिनिधी,
प्रवासी, नागरिक, वाहनचालक, रिक्षाचालक यांच्या सह कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या गावातील ग्रामस्थांसह इतर सर्वाच्याच जीवास धोका निर्माण करणारी कल्याण मुरबाड महामार्गावरील पावशेपाडा गावासमोरील  गाड्याची अनाधिकृत पार्किंग सारखा अंत्यंत गंभीर व जनहितार्थ विषय पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांच्या विविध वृत्तपत्रातून प्रखरपणे मांडल्याने अखेरीस हा रस्ता पुर्णपणे मोकळा झालाचे आज दिसून आले. त्यामुळे अनेकांनी पत्रकार कांबळे यांचे आभार मानले व धन्यवाद दिले.

दोनच दिवसापूर्वी कल्याण मुरबाड मार्गावर पावशेपाडा येथे चारपदरी रस्त्यावर मोठमोठ्या ट्ँव्हल्स कंपनीच्या बसेस अनाधिकृत पार्किंग केल्याची सचित्र बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी दैनिक, लोकदिशा, सागर, धावते नवनगर, माझा बातमीदार आदी विविध वृतपत्रातून प्रसिद्ध केली होती.

यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया आल्या यामध्ये उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, गोपनीय विभागाचे ऐसीपी जाधव साहेब, पोलीस निरीक्षक, पी डी,साबळे, तसेच कल्याण आरटीओ, कर्मचारी, अधिकारी, आदींचा समावेश होता.

याचा परिणाम असा झाला की, आज कल्याण मुरबाड मार्गावरील पार्किंग चे ठिकाणी पुर्णपणे मोकळे झाल्याचे दिसून येत होते, जी एक लेन पार्किंग मुळे अडविण्यात आली होती त्या लेनवरुन आज टु व्हिलर,रिक्षा, कार धावत होत्या, वास्तविक पाहता हा रस्ता व्हावा म्हणून विविध सामाजिक संस्था, संघटना, आदीच्या प्रचंड आंदोलनामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान जवळपास चार पदरी रस्ता झाला खरा, पण याच मार्गावर पावशेपाडा येथे मोठमोठ्या ट्रॅव्हल्सच्या बसेस पार्क केल्याने हा महामार्ग नक्की कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित करुन वास्तववादी बातमी श्री कांबळे यांनी प्रसिद्ध केली. त्यांची दखल घेऊन आज हा रस्ता नागरिकासाठी सुरक्षित झाला आहे. याबद्दल कल्याण गोपनीय विभागाचे पोलीस निरीक्षक पी डी साबळे, इको चालक मालक संघटनेचे सुदाम भोईर, वसंत शिसवे, शेतकरी सेवा सोसायटीचे सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल भोईर, अँड. सुनील गायकर, माझी सरपंच सुनीता गायकर, शेरे ग्रामपंचायतीच्या सदस्यां सविता भालेराव, प्रगतीशील शेतकरी मधुकर रोहणे, यांच्यासह अनेकांनी पत्रकार संजय कांबळे यांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...